टॉप ऑर्डरमध्ये संजू, अभिषेक अन् तिलक, तर गोलंदाजीत….; BCCI किती वाजता करणार घोषणा? जाणून घ्या
एशिया चषक 2025 साठी टीम इंडिया पथक अद्यतनः बीसीसीआय 19 ऑगस्टला आशिया कप 2025 साठी भारतीय संघाची घोषणा करणार आहे. शुभमन गिल ते श्रेयस अय्यर यांच्या टी20 संघात पुनरागमनाच्या चर्चा रंगात आलेल्या आहेत. मात्र, जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. संघ जाहीर करण्याची अधिकृत घोषणा पत्रकार परिषदेत होणार असून, त्यासाठी मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर आणि टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव उपस्थित राहणार आहेत.
कधी, कुठे आणि किती वाजता होणार संघाची घोषणा?
भारतीय निवड समिती मंगळवार, 19 ऑगस्ट रोजी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात जमणार आहे. दुपारी 1:30 वाजता पत्रकार परिषदेला सुरुवात होईल, ज्यात भारताचा 15 सदस्यीय अंतिम संघ जाहीर केला जाईल. या परिषदेत कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर उपस्थित राहतील.
Asia एशिया कपसाठी भारताची पत्रकार परिषद 🚨
– कॅप्टन सूर्यकुमार यादव आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर उद्या दुपारी 1.30 वाजता पत्रकार परिषदेत उपस्थित राहतील. (गौरव गुप्ता). pic.twitter.com/irp72ok0fg
– तनुज (@आयमतानुजसिंग) 18 ऑगस्ट, 2025
आशिया कप कधीपासून सुरू होणार?
आशिया कपची सुरुवात 9 सप्टेंबरला होईल आणि अंतिम सामना 28 सप्टेंबरला खेळवला जाईल. सर्व सामने यूएईमधील अबुधाबी आणि दुबई येथे रंगणार आहेत. या स्पर्धेचे आयोजन बीसीसीआयकडे आहे. सुरुवातीला स्पर्धा भारतात होणार होती, मात्र पाकिस्तानमुळे तटस्थ ठिकाणी सामने घेण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे सर्व सामने यूएईत खेळले जाणार आहेत.
सूर्यकुमार यादव पूर्णपणे फिट
सूर्यकुमार यादव पूर्णपणे फिट असून, ते आशिया कप 2025 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. टेस्ट कर्णधार शुभमन गिल इंग्लंड दौऱ्यात चमकदार खेळ करून परतला असला तरी त्याला टी20 संघात संधी मिळणे कठीण दिसत आहे. टॉप ऑर्डरमध्ये संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे, त्यामुळे निवडकर्ते त्यांच्यावरच विश्वास दाखवण्याची शक्यता आहे.
इंग्लंडमध्ये तब्बल 185.3 षटकं टाकल्याने मोहम्मद सिराजला आशिया कपमधून विश्रांती दिली जाऊ शकते. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहची पुनरागमन जवळपास निश्चित मानली जात आहे. गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी बुमराहसोबत अर्शदीप सिंग, हार्दिक पांड्या आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्यावर असू शकते. फिरकी विभागाची धुरा कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या खांद्यावर असेल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.