‘हा’ आहे मराठमोळ्या ऋतुराजचा दुसरा अवतार! फक्त फलंदाजी नाही, आता गोलंदाजीतही कमाल, पाहा VIDEO
रतुराज गायकवाड बुची बाबू ट्रॉफी: 18 ऑगस्टपासून चेन्नईमध्ये बुची बाबू ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्र आणि छत्तीसगड यांच्यात सामना रंगला. सामन्याचा पहिला दिवस महाराष्ट्रासाठी चांगला ठरला. नेहमी आपल्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला ऋतुराज गायकवाड या वेळी गोलंदाजीला आला आणि त्याने एक विकेटही मिळवली. पहिल्या दिवशी गायकवाडने गोलंदाजीने सगळ्यांना प्रभावित केले, तर पृथ्वी शॉने क्षेत्ररक्षणात तीन झेल घेऊन सर्वांचे लक्ष वेधले. विशेष म्हणजे ऋतुराज गायकवाड आणि पृथ्वी शॉ प्रथमच एका संघात खेळत आहेत.
महाराष्ट्रच्या गोलंदाजांची भेदक कामगिरी
चेन्नईत सुरू असलेल्या या सामन्यात छत्तीसगडने प्रथम फलंदाजी करताना 89.3 षटकांत 252 धावा केल्या. महाराष्ट्राकडून हितेश वलुंज आणि विक्की ओस्टवाल यांनी उत्तम गोलंदाजी करत प्रत्येकी तीन-तीन बळी टिपले. शेवटच्या गड्यासाठी मात्र छत्तीसगडच्या शशांक तिवारी आणि सौरभ मजूमदार या जोडीने तब्बल चार षटके महाराष्ट्राच्या गोलंदाजांना चोपले. शेवटी महाराष्ट्राचा कर्णधार अंकित बावणेने दिवसाच्या अखेरच्या षटकात ऋतुराज गायकवाडच्या हातात चेंडू दिला.
बुची बाबू मल्टी-डे टूर्नामेंटच्या पहिल्या दिवसात रतुराज गायकवाडने दिवस बंद केला आणि आजचा छत्तीसगडचा डाव लपेटण्यासाठी विकेटला बाद केले.
व्हिडिओ सौजन्याने: टीएनसीए#एमसीए #Mcacricket #Mahacricket #टीममाहा #क्रिकेटमहराष्ट्र pic.twitter.com/jzdm29ulddo
– महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (@mahacricket) 18 ऑगस्ट, 2025
गायकवाडने केली मोठी शिकार
ऋतुराजच्या त्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर मजूमदारने एक मोठा षटकार लगावला. पण लगेचच पुढच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो गायकवाडलाच झेल देऊन बाद झाला. त्याचबरोबर छत्तीसगडची डावातील मजल 252 धावांवर थांबली. गायकवाडचा हा विकेट घेणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
संजीत देसाईने ठोकल्या सर्वाधिक 93 धावा
छत्तीसगडच्या फलंदाजीत संजीत देसाईने सर्वाधिक 93 धावा केल्या. अविनाश सिंहने अर्धशतक झळकावले. बाकीच्या फलंदाजांना चांगली सुरुवात मिळाली तरी ते मोठी खेळी करू शकले नाहीत. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राची फलंदाजी असेल.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.