माझे पाणी उतरताना पाहून, किना on ्यावर घर मिटवू नका, मी समुद्रासह परत येईन, मी परत येईन; संदीप देशपंदन्नी ..

मुंबई सर्वोत्तम निवडणुकीचा निकालः बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालात ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा दारुण पराभव झाल्यानंतर भाजप नेत्यांनी ब्रँड ठाकरेची खिल्ली उडवायला सुरुवात केली आहे. भाजपचे नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी ब्रँड ठाकरे म्हणजे भोपळा असल्याची बोचरी टीका केली होती. या टीकेला मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी प्रत्युत्तर दिले. बेस्ट निवडणुकीत पैशांचा वापर झाला. निवडणुकीत जिंकल्यावर काही माणसं अर्ध्या हळकुंडाने पिवळी होतात. मात्र, एवढी सगळी ताकद लावून सहकार समृद्धी पॅनेलचे फक्त 7 उमेदवार निवडून आले. त्यामुळे प्रसाद लाड यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले. ते बुधवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

बेस्ट पतपेढी निवडणुकीत शशांक रावं याचं पॅनेल निवडून आले, त्यांचं मी अभिनंदन करतो. ते बेस्ट पतपेढीचे काम चांगल्या पद्धतीने करतील, अशी अपेक्षा आहे. प्रसाद लाड यांच्या पॅनेलचेही अभिनंदन. मनसेने पहिल्यांदा बेस्ट पतपेढीची निवडणूक लढवली, आम्ही चांगली फाईट दिली. या निवडणुकीत निश्चितपणे पैशांचा वापर झाला. हा आरोप केला तरी टीका केली जाते. पैशांचा वापर झाला हे मी निवडणुकीपूर्वी पुराव्यानिशी दाखवून दिले. निवडणुकीपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेच्या नोटीस आल्या. आता 15 लाखात घरं कशी देणार, हे आम्ही बघतोय. जिंकल्यावर अर्ध्या हळकुंडाने पिवळी होणारी काही माणसं असतात, असा टोला संदीप देशपांडे यांनी प्रसाद लाड यांना लगावला.

Raj Thackeray & Uddhav Thackeray: बेस्ट पतपेढीची निवडणूक लिटमस टेस्ट नव्हती: संदीप देशपांडे

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीवरुन लिटमस्ट टेस्ट बोलू नये, असा कोणताही तर्क लावू नये. युद्ध अजून संपलेलं नाही. प्रसाद लाड यांना मी त्यांच्या गुरुचं वाक्य सांगेन. ‘मेरा पानी उतरता देख, किनारे पे घर मत बसा लेना, मै समंदर हू लोटकर वापर आऊंगा’, हे वाक्य लाड यांनी लक्षात ठेवावे. प्रसाद लाड यांना वेळ आल्यावर कळेलच. शशांक राव यांना अप्रत्यक्ष मदत झाली असेल, असे ते स्वत: म्हणत आहेत. मुंबई बँकची आणि महानगरपालिकेची निवडणूक सारखी नसते, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले.

आणखी वाचा

ठाकरेंना कसं हरवलं, देवेंद्र फडणवीसांची मदत कशी झाली, शशांक राव यांनी BEST निवडणुकीच्या यशाची इनसाईड स्टोरी सांगितली!

बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू का हरले? ‘या’ गोष्टीने उद्धव ठाकरेंचा घात केला

बेस्ट निवडणुकीच्या मतमोजणीत ट्विस्ट, मध्यरात्री पुन्हा मतं मोजली अन् निकाल बदलला, नेमकं काय झालं?

आणखी वाचा

Comments are closed.