शेअर बाजारात तेजी सुरु, सेन्सेक्स निफ्टीवर 21 ऑगस्टला ‘या’ सात स्टॉकवर लक्ष ठेवा, कमाईची संधी
मुंबई: भारतीय शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. सेन्सेक्स 213.45 अंकांच्या तेजीसह 81857.84 अंकांवर बंद झाला. निफ्टी 50 मध्ये 69.90 अंकांची वाढ होऊन तो 25050.55 वर बंद झाला. भारतीय शेअर बाजारातील तेजीचा परिणाम गुरुवार (21 ऑगस्ट) रोजी दिसून येऊ शकतो. गुरुवारी काही स्टॉक्समध्ये जोरदार घडाोडी पाहायला मिळू शकतात. टेलिकॉम, रेल्वे, वाईन, बॅटरी, सीमेंट आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील 10 स्टॉक्समध्ये घडामोडी पाहायला मिळू शकतात.
रेल्टेल
टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला ओडिसा आणि केरळमध्ये सरकारी यंत्रणांकडून एकूण 50.42 कोटी रुपयांच्या दोन वर्क ऑर्डर मिळाल्या आहेत. रेलटेलचा शेअर बुधवारी 0.02 टक्क्यांच्या किरकोळ तेजीसह 359.20 रुपयांवर बंद झाला.
ज्युपिटर वॅगन्स (Jupiter Wagons)
रेल्वे फ्रेट वॅगन निर्माता कंपनी Jupiter Wagons ची अनलिस्टेड सहायक कंपनी Jupiter Tatravagonka Railwheel Factory Private Limited ला वंदे भारत ट्रेनसाठी व्हीलसेट पुरवठ्याचं लेटर ऑफ इंटेंट मिळालं आहे. हे पत्र 19 ऑगस्ट 2025 ला जारी करण्यात आलं आहे. यामध्ये एकूण 5376 व्हीलसेटसचा पुरवठा करायचा असून त्याचं मूल्य 215 कोटी रुपये आहे.
अल्ट्राटेक
अल्ट्राटेकनं इंडिया सिमेंटसमधील 2.01 कोटी इक्विटी शेअर विक्रीला मंजुरी दिली आहे. कंपनीतील 6.49 टक्के भागदारीच्या बरोबर आहेत. ही विक्री ऑफर फॉर सेलद्वारे केली जाईल. यानंतर अल्ट्राटेक सिमेंटची इंडिया सिमेंटमध्ये भागीदारी 75 टक्के राहील.
एक्झीड इंडस्ट्रीज
बॅटरी उत्पादक एक्साइड इंडस्ट्रीजनं त्यांची सहायक कंपनी एक्साइड एनर्जी सोल्यूसन्स लिमिटेडमध्ये राइट्स इश्यू च्या माध्यमातून 100 कोटींची गुंतवणूक केली. ही गुंतवणूक 2.5 कोटी शेअर्या माध्यमातून 10 रुपयांचा शेअर 30 रुपयांच्या प्रिमियम वर घेण्यात आला.
सुला वियनार्ड्स (सुला व्हाइनयार्ड्स)
भारतातील सर्वात मोठी वाईन निर्मिती आणि विक्री करणारी कंपनी सुला वाईन यार्डस प्रिमियम स्पिरिटस सेगमेंटमध्ये विस्तार करण्याचं नियोजन करत आहे. कंपनी दोन ते तीन छोट्या ब्रँडस सोबत अधिग्रहणाबाबत चर्चा करतेय, त्यामुळं कंपनीची व्हिस्की, स्कॉच आणि वोडका कॅटेगरीत एंट्री होऊ शकते.
टायटन (Titan)
टाटा ग्रुपच्या टायटन कंपनी लिमिटेड ने सांगितलं की पी बी बालाजी यांनी 20 ऑगस्टला कंपनीच्या नॉन- एक्झिक्यूटिव्ह आणि नॉन इंडिपेंडेंट संचालक पदावरुन राजीनामा दिला आहे. बालाजी म्हणाले की त्यांनी त्यांच्या इतर कामांमुळं त्यांना या कामात पूर्ण वेळ देता येत नव्हता.
झी एंटरटेनमेंट ( Zee Entertainment)
झी एंटरटेनमेंटनं म्हटलं की आदित्य बिर्ला फायनान्स लिमिटेडनं दिल्ली हायकोर्टात एक याचिका केली आहे. कंपनी विरोधातील सर्व दाव्यांना फेटाळ्यात आलेल्या निर्णयाला आव्हान देण्यात आलं आहे. 12 मेच्या अंतिम निर्णयानुसार एबीएफएलचे सर्व दावे फेटाळले गेले होते. हे प्रकरण 134 कोटींच्या टर्म लोनशी संबंधित होते.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.