मला नथुराम गोडसे व्हावं लागेल म्हणणाऱ्या कीर्तनकार भंडारेंचा नवा दावा, म्हणाले, ‘हल्ला माझ्यावर
पुणे : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरत यांच्यावर मी हल्ला करणार असं म्हणालो नाही. तर त्यांना अंतर्मुख करण्यासाठी मला नथुराम गोडसे व्हावं लागेल, असं मी म्हटल्याचं कीर्तनकार संग्राम भंडारेंनी खुलासा केला आहे. संगमनेरमधील 16 ऑगस्टच्या किर्तनावेळी माझ्यावर हल्ला झाला. कीर्तनकारांवर असे हल्ले व्हायला लागले तर ही धोक्याची घंटा आहे, असं असताना या घटनेचं बाळासाहेब थोरातांनी मात्र समर्थन केलं. त्यामुळं बाळासाहेब थोरातांना या हल्ल्याचं गांभीर्य लक्षात यावं म्हणून मी नथुराम गोडसेंचे नाव घेतल्याचं भंडारे यांनी म्हटलं आहे.
75 वर्षात गोडसेंचे हे विचार कोणाच्या घरात पोहचू दिले नाहीत
मी कुठं ही थोरातांवर हल्ला करतोय, असं म्हणालो नसल्याचा खुलासा भंडारेंनी केला आहे. मुळात नथुराम गोडसे म्हटलं की फक्त बंदूक आठवते. उलट गोडसेंचा अभ्यास करायला हवा, गोडसेंचे हिंदुत्व समाजासमोर यायला हवं. गेल्या 75 वर्षात गोडसेंचे हे विचार कोणाच्या घरात पोहचू दिले गेले नाहीत. नथुराम गोडसे म्हणजे फक्त बंदूक नाही. असं भंडारे म्हणत आहेत. दाऊद विरोधात पर्याय म्हणून लॉरेन्स बिष्णोईचं उदाहरण द्यावं लागेल. मी तरुणांना बिष्णोई व्हा, असा सल्ला दिलेला नाही, असा ही खुलासा भंडारेने केला आहे. जर आमच्या अंगावर आले तर हिंदूंमध्ये ही लॉरेन्स बिष्णोई आहे, असा इशारा देण्याचा प्रयत्न भंडारेंनी केला. वारकरी संप्रदायाकडे शांततेचं प्रतीक म्हणून पाहिलं जातं, मुळात तसं नाही. तर वारकरी संप्रदायाचे दोन अंग आहेत. त्यातला दुसरा अंग म्हणजे एका गालात मारली तर दुसरा गाल पुढं करा. हे हिंदू धर्माचे तत्व नाही, असं ही भंडारे म्हणाले आहेत.
थोरात हल्लेखोरांचं समर्थन करत आहेत
मला तर असं वाटत आहे हल्लेखोरांना बाळासाहेब थोरात यांनीच पाठवलं होतं की काय, जेव्हा माझं कीर्तन झालं, थोरात त्यांच्या मूळ जोरवे गावात त्या कीर्तनाच्या व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. ते घुलेवाडीतले नाहीत. त्यामध्ये मी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बद्दल बोललो आहे, अमोल खताळ यांच्याबद्दल बोललो आहे. हे सर्वजण तिथे उपस्थित होते, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल बोललो. बाळासाहेब तिथे उपस्थित असते तर मी त्यांच्याबद्दल दोन शब्द सकारात्मक बोललो असतो. जोरवे येथे बोलताना जे हिंदुत्व मी तिथे मांडलं, त्याचा राग थोरात यांना आलेला असेल आणि मला आता असं वाटत आहे की ते हल्लेखोर देखील बाळासाहेब थोरात यांनी पाठवलेले होते, कारण थोरात हल्लेखोरांचं समर्थन करत आहेत. माझी इच्छा होती, माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात जो हिंदूंचा मोर्चा निघाला त्यामध्ये हिंदू म्हणून बाळासाहेब थोरात यांनी सहभागी व्हायला पाहिजे होतं. एकटे आमदार अमोल खताळ त्यामध्ये दिसले, बाळासाहेब थोरात यांनी तिथं दिसायला हवं होतं. पण थोरात यांनी विरोधकाची भूमिका घेतली आणि हल्लेखोरांचा समर्थन केलं, याचं मला दुःख झालं आहे. मी त्यांना अंतर्मुख करण्यासाठी गोडसे यांचे नाव घेतलं होतं. मी म्हणालो नाही मी बाळासाहेब थोरात तुमच्यावर हल्ला करतो, माझ्यावर तर हल्ला झाला आहे. माझ्यावर अन्याय झाला आहे आणि सहानुभूती बाळासाहेब थोरात घेत आहेत असेही भंडारे यांनी म्हटलं आहे.
https://www.youtube.com/watch?v=kx8elobbi9s
आणखी वाचा
Comments are closed.