खासदार संजय राऊतांचे पंतप्रधान मोदींना पात्र; म्हणाले, …तरीही, पाकिस्तानसोबत सामना वेदनादायी

संजय राऊत पत्र पंतप्रधान मार्ग : आशिया कप 2025 स्पर्धेत पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी मोदी सरकारच्या क्रीडा मंत्रालयाने ग्रीन सिग्नल दिला आहे. मात्र जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत-विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan Asia Cup) या सामन्याला कडाडून विरोध केला जात होता. आशिया कप 2025 स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर झाल्यापासूनच भारताने पाकिस्तान विरुद्धच्या या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे. अशातच, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याला आता दिवसेंदिवस विरोध  (Ind vs Pak Match Boycott) वाढत असताना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपला निषेध व्यक्त केला आहे.

भारत-पाकिस्तान आशिया कप 2025 मध्ये खेळवण्यास क्रीडा मंत्रालयाने हिरवा कंदील दिल्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून निषेध व्यक्त केला आहे. आशिया कप क्रिकेट स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामने खेळवण्यास हिरवा कंदील दिल्याची बातम्या प्रसिद्ध होत असताना ही बाब वेदनादायी असून गृह आणि पंतप्रधान कार्यालयाच्या परवानगीशिवाय हे शक्य नसल्याचं संजय राऊत यांनी पत्रात म्हटला आहे. पत्रात काही मुद्द्यांवर संजय राऊत यांनी बोट ठेवत या सगळ्या निर्णयासंदर्भात निषेध व्यक्त केला आहे

पत्रात नेमकं काय म्हणाले संजय राऊत?

– तुम्ही म्हणता की पाकिस्तानविरुद्धचे ऑपरेशन सिंदूर संपलेले नाही. जर संघर्ष अजूनही सुरूच असेल तर आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट कसे खेळू शकतो?
-पहलगाम हल्ला एका पाकिस्तानी दहशतवादी गटाने केला होता, ज्याने 26 महिलांचे सिंदूर पुसले होते. तुम्ही त्या माता आणि बहिणींच्या भावनांचा विचार केला आहे का?

– जर आपण पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळलो नाही तर व्यापार थांबवण्याची धमकी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दिली आहे का?

-तुम्ही घोषित केले होते की “रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही.” आता, रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहू लागतील का?

– पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात सट्टेबाजी आणि ऑनलाइन जुगार खेळला जातो. ज्यामध्ये अनेक भाजप सदस्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. गुजरातमधील एक प्रमुख व्यक्ती जय शाह सध्या क्रिकेट व्यवहार सांभाळत आहेत. यामध्ये भाजपला मोठी आर्थिक उलाढाल होते का?

– हे सामने दुबईत होत आहेत. जर ते महाराष्ट्रात झाले असते तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेने त्यात व्यत्यय आणला असता. हिंदुत्व आणि देशभक्तीपेक्षा पाकिस्तानसोबत क्रिकेटला प्राधान्य देऊन तुम्ही देशातील लोकांच्या भावनांना निरर्थक समजत आहात.

असं म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान यांना या सगळ्या संदर्भात पत्र लिहीत पक्षाच्या वतीने निषेध व्यक्त केला आहे.

हे हि वाचा

Team India : आशिया कपपूर्वी बीसीसीआयचे धक्कातंत्र! 15 वर्षांपासून संघात असलेल्या मेंबरला दाखवला बाहेरचा रस्ता, जाणून घ्या कारण

आणखी वाचा

Comments are closed.