मराठी लोगो की औकात क्या, तुम मराठी लोक भंगार हो; नाशिकमध्ये परप्रांतीयाची मुजोरी, मनसैनिकांकडून
नाशिक बातम्या: नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी यांच्यात वाद झाल्याची घटना उघडकीस आली आहे. गाडी शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने जय भवानी रोड परिसरातील एका गाडीला दिली. यानंतर या परप्रांतीय व्यक्तीने अरेरावी केल्याचा आरोप केला जात आहे. मराठी लोगो की औकात क्या, तुम मराठी लोक भंगार हो, अशी मुजोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी परप्रांतीयाला चोप दिला आहे.
नेमकं काय घडलं?
नाशिकरोडच्या जयभवानी रोड परिसरात एका मुजोर परप्रांतीयाने स्थानिक रहिवासी लासूर नावाच्या मराठी कुटुंबाला दादागिरी करून शिवीगाळ करत मारहाण केली. हा परप्रांतीय चारचाकी शिकताना लासुरे कुटुंबाच्या प्लेझर गाडीवर धडकला व गाडीचे नुकसान केले. लासुरे कुटुंबाने जाब विचारल्यानंतर कुटुंबाला शिवीगाळ केली.
तुम मराठी लोग तुम्हारे औकात में रहो. तुम्हारी गाडी भंगार है और तुम्हारा घर भी भंगार है, असे परप्रांतीय बोलू लागला. त्यानंतर जयभवानी रोड येथील स्थानिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांना हे समजल्यावर या परप्रांतीयाला त्यांनी समज दिली. परंतु या मुजोर परप्रांतीयाने उर्मटपणे उत्तर दिले की, मला मराठी येत नाही व मी हिंदीत बोलणार. तुम्ही माझ्याशी हिंदीत बोला, हे ऐकून मनसैनिकांनी परप्रांतीयाला चोप दिला व मराठी कुटुंबाची माफी मागण्यास सांगितले. याप्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झाला नसला तरीही गाडीला धडक दिल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.
https://www.youtube.com/watch?v=gdwtdj7orgk
Nashik Crime : सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची धडक कारवाई
दरम्यान, आगामी गणेशोत्सवाच्या आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांची धडक कारवाई सुरू झाली आहे. पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ एक आणि दोन मध्ये कोबिंग ऑपरेशन, ऑल आउट मिशन राबवून रेकॉर्डवरच्या गुन्हेगाराची चौकशी केली जात आहे. परिमंडळ एकमध्ये राबविलेल्या कोबिंग ऑपरेशनमध्ये 127 रेकॉर्डवरच्या गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली. त्यातील एकाकडे शस्त्र आढळून आले आहेत तर 32 तडीपार गुंडांपैकी सूरज वर्मा नावाचा तडीपार बेकायदेशीर पणे शहरात वास्तव्यास असल्याचे निदर्शनास आले असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तर परिमंडळ दोन मधील नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 27 छोटे चाकू, कोयता, दोरी आणि तिखटची पावडर आढळून आली आहे. या प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघे कल्याण तर इतर दोघे जळगावचे आहेत. तर एक आरोपी फरार असून त्याची ओळख अद्याप पटायची आहे. हे सर्व दरोड्याच्या प्रयत्नांत असल्याचा पोलिसांना संशय असून या प्रकरणी पुढील तपास केला जात आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.