हिंजवडीत मिक्सर ट्रकच्या धडकेत 11 वर्षीय मुलीचा मृत्यू, मिक्सर चालक, मालकावर सदोष मनुष्यवधाचा ग
पुणे: गेल्या काही वर्षांपासून आय टी नगरी हिंजवडी आणि आसपासच्या परिसरात अवजड वाहने बेदरकारपणे चालवल्यामुळे अनेक जीवांचे बळी गेलेत, काही दिवसांपूर्वी प्रत्यूषा संतोष बोराटे या अकरा वर्षीय मुलीचा मृत्यू झाला होता, या प्रकरणी आता हिंजवडी पोलिसांनी ट्रक मिक्सर चालकासह त्याच्या मालकावरही गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मिक्सर ट्रक चालक फरहान मुन्नू शेख, मालक – प्रदीप मारुती साठे आणि सुपरवायझर प्रसाद मंडलिक यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला आहे. हिंजवडी परिसरात या अवजड वाहनांमुळे होणारे अपघात याला आळा घालण्यासाठी आता पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.
तर माझा ही जीव घ्यावा
हिंजवडी परिसरात सकाळी 8 ते 12 आणि सायंकाळी 4 ते 9 या कालावधीत अवजड वाहने बेदरकारपणे धावताना दिसल्यास त्यांच्यावर कारवाईची मोहीम सुरू करण्यात आलीय. जानेवारी महिन्यात झालेल्या अपघातात नंतर जर या मिक्सर ट्रक वर पोलिसांनी कारवाई केली असती तर आज प्रत्यूषा वाचली असती अशा भावना व्यक्त करत तीच्या आई वडिलांनी माझ्या मुलीचा बिल्डरने खून केलाय त्याला पाठीशी घातलं जातंय माझी त्यांच्या विरोधात तक्रार आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी नसेल जमत तर माझा ही जीव घ्यावा अशी भूमिका घेतली आहे.
त्या अपघातामध्ये प्रत्यूषा संतोष बोराटे हिचा अपघातात मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्या मिक्सर वाहनाचा ड्रायव्हर, मालक, आणि सुपरवायझर या तिघांवर हिंजवडी पोलिसांनी कारवाई केली आहे, आणि त्या संदर्भात तपास सुरू आहे, त्या मिक्सरने त्या वेळेत वाहनांना परवानगी नसताना वाहन त्या मार्गावरून नेल्याने कलमांमध्ये वाढ करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे, त्यांनी त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे, असंही प्रत्यूषा बोराटेच्या आई वडिलांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.