परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही 8 सप्टेंबरला देहत्याग करणार; पुणे विजयनगर अनंतपुर येथील वीस भावि

अथानी: कर्नाटक राज्यातील अथनीमधून धक्कादायक प्रकार समोर येत आहे. परमेश्वराचे आम्हाला बोलावणे आले आहे. त्यामुळे आम्ही 8 सप्टेंबरला देहत्याग करणार अशी भूमिका काही भक्तांनी घेतली आहे. त्यामुळे कर्नाटकातील सीमा भागात बरोबरच महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. कारण देहत्याग करण्याचा निर्णय घेतलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्रातील भक्तांची संख्या अधिक आहे. अनंतपूर या ठिकाणी रामपाल महाराजांचा मठ आहे. देह त्याग करण्याचा निर्णय घेतलेल्या भक्तांनी रामपाल महाराजांची दीक्षा घेतली आहे.

पुण्यातील दहा भाविकांचा समावेश

तब्बल 20 जणांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये पुण्यातील दहा भाविकांचा समावेश आहे. तर अनंतपूर आणि विजयपूर इथल्या प्रत्येकी पाच भक्तांनी देहत्यागाचा निर्णय घेतला आहे. मात्र, अन्य मठांच्या महाराजांनी सर्व भक्तांची समजूत काढल्याने देहत्याग करण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतला आहे. अनंतपूर येथील एकाच इरकर कुटुंबातील पाच जणांनी देहत्यागाचा निर्णय घेतला. त्यामुळे आता आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग त्यांची चौकशी करून त्यांना ताब्यात घेणार आहेत. मात्र यामध्ये पुण्यामधील 10 भाविकांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. नावं समजताच त्यांची देखील आरोग्य विभाग आणि पोलीस विभाग चौकशी करून ताब्यात घेणार आहेत. देहत्याग करणाचा निर्णय घेणाऱ्यामध्ये मूळचे उत्तरप्रदेशचे असलेले पुण्यातील दहा, अनंतपूर व विजयपूर येथील प्रत्येकी पाच व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्वजण रामपाल महाराजांचे शिष्य असल्याचे संगितले जाते. यापूर्वी 6 ते 8 सप्टेंबरदरम्यान अनंतपूर येथे विशेष महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तिचा समारोप देहार्पणाने केला जाणार आहे. हे सारे पाहण्यासाठी भक्तांचा मोठा समुदाय जमणार असल्याचे या भाविकांनी सांगितले.

एकाच कुटुंबातील 5 जण

कर्नाटक सीमेवरील अनंतपूर गावात शिंगणापूर रस्त्याला तुकाराम इरकर यांचे 5 सदस्यांचे कुटुंब आहे. इरकर म्हणाले की, रामपाल महाराजांकडून आम्ही दीक्षा घेतली आहे. आता आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असून 8 सप्टेंबर रोजी परमेश्वराचे बोलावणे आले आहे. त्यानुसार ६ सप्टेंबरला सकाळी महापूजेला सुरुवात होईल. 8 रोजी आम्ही देहासह वैकुंठी जाणार आहोत. ‘परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे आम्ही वैकुंठाला प्रयाण करत आहोत,’ अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.त्यांच्या या निर्णयापासून त्यांना परातृव करण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरू केले होते.जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन ही घटना घडू नये म्हणून प्रयत्न करत होते. मतपरिवर्तन न झाल्यास या कुटुंबावर कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

Comments are closed.