गणपतीला डीजे नको, बाहेरुन बँड मागवा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडी आहे: संजय शिरसाट

जेनपती डीजे वर संजय शिझिस: राज्यातील आगामी गणेशोत्सवात कर्णकर्कश डीजे (DJ system) वाजवण्यावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री संजय शिरसाट यांनी छत्रपती संभाजीनगरमधील गणेश मंडळांना (Ganesh Mandal) डीजेऐवजी बँड, बँजो मागवा, असे आवाहन केले. यावेळी संजय शिरसाट यांनी एक मिश्कील टिप्पणी केली. तुम्ही बाहेरुन बँड मागवा, पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी संजय शिरसाट हे एका खोलीत बसले असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत त्यांच्या खोलीत पैशांच्या नोटांनी भरलेली बॅग दिसली होती. या व्हिडीओ प्रचंड चर्चा रंगली होती. या अनुषंगाने संजय शिरसाट यांनी संभाजीगरमधील कार्यक्रमात मिश्कील भाष्य केले. (Ganesh Utsav 2025)

अनेकजण वाद सुरु झाला पाहिजे, या मानसिकतेत आहेत. मी सर्व मंडळांच्या अध्यक्षांना विनंती करतो की, आपल्याला डीजे काय करायचाय, आपल्याला चाळीसगावचा बँड मागवा ना, वैजापूरचा बेंजो मागवा. पैसे कमी पडले तर हे सगळे लोक आहेत, असे सांगत त्यांनी व्यासपीठावरील नेत्यांकडे अंगुलीनिर्देश केला. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. यापुढे संजय शिरसाट म्हणाले की,  काही झालं नाही तर मी आहेच. माझी बॅग उघडीच आहे. संजय शिरसाटांच्या या वक्तव्यावर आणखी मोठा हशा पिकला.

गणेशोत्सवात आपण चांगला संदेश दिला पाहिजे. व्हिडीओ वगैरे सोडून द्या, हे सगळं चालत राहतं. संजय शिरसाट त्याची चिंता करतो का कधी? लोक आपल्याला करोडपती समजत असतील तर आपल्या बापाचं काय जातं? आपण चिंता करायची नसते. शहर चांगल्या मार्गाने जात असेल तर त्याला मदत करणं आपलं कर्तव्य आहे, असे सांगत संजय शिरसाट यांनी डीजेऐवजी बँड पथकाचा पर्याय निवडण्याचे आवाहन उपस्थितांना केले.

Chhatrapati Sambhaji Nagar: डीजेमुळे एखाद्या मुलाचे कान गेले तर… संजय शिरसाटांच्या गणेश मंडळांना कानपिचक्या

या कार्यक्रमात संजय शिरसाट यांनी डीजेसाठी आग्रही असणाऱ्या गणेश मंडळांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या. त्यांनी म्हटले की, काही गणेश मंडळांचे अध्यक्ष मला शहाणपणा शिकवतात की, आम्ही डीजेवाल्याला आता 10 हजार देऊन बसलोय. ते 10 हजार गेले तरी चालतील. एखाद्या मुलाचे कान गेले तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, एखादा माणूस हार्ट अ‍टॅकने गेला तर त्याचा संसार उद्ध्वस्त होऊन बसल, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.

Satara News: कराड शहर पोलीस ठाण्यात पहिला गणेश मंडळावर गुन्हा दाखल

कराड तालुक्यातील मलकापूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी गणेश मंडळ मिरवणुकीमुळे वाहतुकीला अडथळा ठरल्याने आगमन सोहळ्यालाच कराड शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. महामार्गावर गणेश मंडळाच्या मिरवणुकीत डिजे साऊंड सिस्टिमचा वापर आणि एलईडीचा वापर करण्यात आला. या प्रकरणात गणेश मंडळाच्या अध्यक्षासह ट्रॅक्टर चालक-मालक असा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड शहरात तब्बल रात्री पाच ते सहा तास महामार्गावर ट्रॅफिक जाम झाले होते. कराड शहर वाहतूक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त ठेवून सुद्धा गणपती सणाला जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा आपला कोल्हापूर दौरा रद्द करून कराडमध्येच मुक्काम केला.

आणखी वाचा

डीजे,डॉल्बी मिरवणूक ही अंत्ययात्रा, काहीही करून बंदी आणा, साताऱ्यात मागणी; कोल्हापुरात गणेशोत्सवात लेसर लाईटच्या वापरावर बंदी

आणखी वाचा

Comments are closed.