सिंहगडावरुन बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाड प्रकरणाला वेगळं वळणं, बेपत्ता नव्हे तर बनाव रचला, धक्

पुणे: पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून गायब झालेला गौतम गायकवाड हा तरुण अखेर सापडला आहे. गेल्या पाच दिवसांपासून पुण्यातील सिंहगड किल्ल्यावरून हा तरुण बेपत्ता झाला होता. गौतम गायकवाड हा सिंहगड किल्ल्यावर असणाऱ्या तानाजी कड्यावरून गायब झाला होता अशी माहिती समोर आली होती. पुणे पोलिसांनी CCTV मार्फत त्या तरुणाचा शोध घेतला आहे. काल (रविवारी,ता24) संध्याकाळच्या सुमारास गौतम सापडला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली होती. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आणि CCTV फुटेजच्या आधारे या तरुणाचा शोध घेतला. अखेर काल संध्याकाळच्या सुमारास गौतम गायकवाड सापडला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार त्याने स्वतःच्या बेपत्ता होण्याचा बनाव रचला होता.

बेपत्ता होण्याचं कारण काय?

बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाड या तरुणावर मोठं कर्ज असल्यामुळे त्याने असा मार्ग अवलंबल्याचं पोलिस तपासात समोर आलं आहे. सध्या त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून पुढील चौकशी सुरू आहे. सिंहगड किल्ल्यावर असणाऱ्या तानाजी कडा येथून घसरून खोल दरीत पडल्याचे त्याच्या मित्रांनी पोलिसांना कळवलं होतं. तेव्हापासून गौतमला शोधण्यासाठी सिंहगड किल्ला आणि पायथ्याशी आपत्ती व्यवस्थापन, हवेली पोलीस प्रशासन तपास घेत होते. याच दरम्यान सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका सीसीटीव्हीमधून गौतम हा पळत आणि लपून जात असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे गौतम हा कड्यावरून पडला की त्याने स्वतःहून हा बनाव रचवला या संदर्भात पोलीस तपास करत होते. त्यानंतर आता त्याने हा बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे.

काल (रविवारी 24 ऑगस्ट) गौतमला शोधत असताना सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास काही स्थानिक नागरिकांना दरीच्या एका भागात हालचाल जाणवली. त्यांनी तातडीने शोध घेतल्यावर गौतम गायकवाड जिवंत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला घेऊन गडावरील वाहनतळाच्या दिशेने नेलं. हवेली पोलिसांनी याबाबतची खात्री करण्यासाठी त्वरित आपले पथक घटनास्थळी रवाना केले,त्यानंतर आता गौतमवरती उपचार सुरु आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

गौतम गायकवाड हा मूळचा सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील असून सध्या हैदराबाद येथे वास्तव्यास आहे. हैदराबादहून तो आपल्या मित्रांसह महेश शिंदे, हिमांशू शुक्ला, वैष्णवी आलगुडे आणि सूरज माळी पुण्यातील सिंहगड किल्ला पाहण्यासाठी आला होता. बुधवारी दुपारी साडेचारच्या सुमारास हे सर्वजण सिंहगडावर पोहोचले. संध्याकाळच्या वेळेस ते तानाजी कड्याजवळ गेले असता, गौतमने मित्रांना “मी लघुशंकेला जातो” असे सांगून दूर गेला.

मात्र बराच वेळ उलटल्यानंतरही तो परत आला नाही. मित्रांनी ठिकठिकाणी शोध घेतला, पण गौतम कुठेच आढळला नाही. शोध घेताना केवळ त्याची चप्पल जवळच सापडली. परंतु तो मात्र काही दिसला नाही. शेवटी साधारण साडेसात-पावणेआठच्या सुमारास मित्रांनी 100 नंबरवर संपर्क साधून पोलिसांना माहिती दिली. तेव्हापासून त्याचा शोध सुरू होता, तो काल संध्याकाळी मिळून आला.

आणखी वाचा

Comments are closed.