परराज्यातून आलेल्या भाविकांना पाठवलं परत; देहत्यागाचा निर्णय मागे, पुण्यामधील भाविकांना पाठवलं,

अथनी: महाराष्ट्र कर्नाटक राज्याच्या अथनीमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परमेश्वराचे आम्हाला बोलावणे आले आहे. त्यामुळे आम्ही 8 सप्टेंबरला देहत्याग करणार अशी भूमिका काही भक्तांनी घेतली होती. त्यामुळे कर्नाटकातील सीमा भागात बरोबरच महाराष्ट्रात खळबळ उडाली. कारण देहत्याग करण्याचा निर्णय घेतलेल्या नागरिकांमध्ये महाराष्ट्रातील भक्तांची संख्या अधिक आहे. अनंतपूर या ठिकाणी रामपाल महाराजांचा मठ आहे. देह त्याग करण्याचा निर्णय घेतलेल्या भक्तांनी रामपाल महाराजांची दीक्षा घेतली आहे. तब्बल 20 जणांनी देहत्याग करण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये पुण्यातील दहा भाविकांचा समावेश होता. तर अनंतपूर आणि विजयपूर इथल्या प्रत्येकी पाच भक्तांनी देहत्यागाचा निर्णय घेतला होता. मात्र अन्य मठांच्या महाराजांनी सर्व भक्तांची समजूत काढल्याने देहत्याग करण्याचा निर्णय त्यांनी मागे घेतला आहे. परराज्यातून आलेल्या भाविकांना पुन्हा एकदा परत आपल्या घरी पाठवले आहे.

तर अनंदपूर येथील इरकर कुटुंबाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. पुण्यामधील भाविकांना देखील पुन्हा एकदा पुण्याकडे पाठवले आहे. तुकाराम इरकर, सावित्री इरकर वैष्णवी इरकर, रमेश इरकर हे देहत्याग करणार होते. इतर मठातील स्वामींनी समजूत काढल्यानंतर देहत्याग करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. अनंतपूर येथील एकाच इरकर कुटुंबातील पाच जणांनी देहत्यागाचा निर्णय घेतला होता. पुण्यामधील 10 भाविकांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

नेमकं प्रकरण काय?

हे सर्वजण रामपाल महाराजांचे शिष्य असल्याचे संगितले जाते. यापूर्वी 6 ते 8 सप्टेंबरदरम्यान अनंतपूर येथे विशेष महापूजा आयोजित करण्यात आली आहे. तिचा समारोप देहार्पणाने केला जाणार आहे. हे सारे पाहण्यासाठी भक्तांचा मोठा समुदाय जमणार असल्याचे या भाविकांनी सांगितले होते. इरकर यांनी याबाबत बोलताना सांगितलं होतं की, रामपाल महाराजांकडून आम्ही दीक्षा घेतली आहे. आता आयुष्याची इतिकर्तव्यता झाली असून 8 सप्टेंबर रोजी परमेश्वराचे बोलावणे आले आहे. त्यानुसार 6 सप्टेंबरला सकाळी महापूजेला सुरुवात होईल. 8 रोजी आम्ही देहासह वैकुंठी जाणार आहोत. ‘परमेश्वराच्या आदेशाप्रमाणे आम्ही वैकुंठाला प्रयाण करत आहोत,’ अशी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांच्या या निर्णयापासून त्यांना परातृव करण्याचे प्रयत्न प्रशासनाने सुरू केले होते. जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासन ही घटना घडू नये म्हणून प्रयत्न करत होते. त्यांचं मतपरिवर्तन करण्यात यश आलं आहे. त्यानंतर आता परराज्यातून आलेल्या भाविकांना पुन्हा एकदा परत आपल्या घरी पाठवले आहे.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.