मित्रांसोबत सिंहगडावर फिरायला आला; कड्यावरून पडला, 4 दिवसांनी जिवंत सापडला, गौतम गायकवाड प्रकरण

पुणे: गेल्या पाच दिवसांपासून सिंहगड किल्ल्यावरून फिरण्यासाठी गेलेला एक तरूण बेपत्ता झाल्याने रहस्य निर्माण झाले होते. पुण्यातील गौतम गायकवाड, वय 24, हा आपल्या मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर गेला होता. मात्र तानाजी कडा परिसरात फोटो काढताना तो अचानक खोल दरीत कोसळल्याची भीती व्यक्त केली जात होती. NDRF, अग्निशामक दल, वन विभाग, पोलिस अशा विविध पथकांनी सलग पाच दिवस शोधमोहीम राबवली. मात्र त्याचा काहीच मागमूस लागत नव्हता. कुटुंबीयांवर शोककळा पसरली होती. मात्र दुसऱ्या दिवशी सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या एका सीसीटीव्ही कॅमेरात गौतम गायकवाड दिसल्याचा दावा केला जात होता. गौतम गायकवाड कड्यावरून खाली कोसळला की कुठे निघून गेला आणि त्याने दरीत पडल्याचा बनाव रचला का? असा प्रश्न उपस्थित झाला होता.

त्याने बेपत्ता असल्याचा बनाव का रचला?

गेल्या 4 दिवसांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता. अखेर चौथ्या दिवशी गौतम गायकवाड सिंहगड किल्ल्यावरच सापडला. सापडला तेव्हा तो आजारी अवस्थेत होता. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गौतम गायकवाड सापडला. मात्र चार दिवस तो कुठे बेपत्ता होता. त्याने बेपत्ता असल्याचा बनाव का रचला. या प्रश्नांची उत्तर अद्याप समोर आलेली नाहीत. सध्या गौतम गायकवाड बोलण्याच्या मनस्थितीत नाही. रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहे. मात्र रुग्णालयातून परतल्यानंतर पोलीस त्याच्याकडे चौकशी करतील आणि त्यानंतर गौतम गायकवाड चार दिवस नेमका होता कुठे या प्रश्नाचे उत्तर मिळेल.

खरं तर गौतम गायकवाड चार मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर आला होता. फळांचा व्यवसाय करणाऱ्या गौतम गायकवाडची लाखोंची उलाढाल होती. त्याच्यावरती मोठं कर्ज असल्याची माहिती आहे, त्यामुळे यातून तर त्याने अशा प्रकारचं पाऊल उचललं नाही ना? त्याच्या या बेपत्ता पुण्याच्या मागे त्याचे मित्र तर सहभागी नाहीत ना? असे अनेक प्रश्न आता निर्माण झाले आहे? पुणे ग्रामीण पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाची अधिक चौकशी करत आहेत? रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर गौतम गायकवाडची पोलीस चौकशी करतील आणि त्यानंतर या सर्व प्रश्नांची उत्तर मिळतील असं म्हणायला हरकत नाही.

दरम्यान गौतमचा शोध लागला असला तरी या प्रकरणात आढळलेल्या सीसीटीव्ही फुटेजमुळे निर्माण झालेला संभ्रम मात्र अजूनही कायम असल्याचं दिसून येत आहे. गौतम सापडला तेव्हा तो खूप थकला होता, त्याला थंडी वाजत होती आणि त्याच्या अंगावर मार जखम झालेली होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आढळलं?

हैदराबादवरून मित्रांसोबत फिरायला आलेला गौतम बेपत्ता झाल्यानंतर सिंहगड किल्ला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले होते. या सीसीटीव्हीमध्ये एक तरुण लपत छपत जात असल्याचं दिसत होतं. सदर तरुण गौतमच आहे की आणखी कोणी, याबाबतची स्पष्टता आली नव्हती. आता गौतम जिवंत आढळून आल्याने पोलीस तपासातून याबाबतची सर्व माहिती उकल होणार असून संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे.

आणखी वाचा

Comments are closed.