संजय सावकारेंची भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदावरुन अचानक उचलबांगडी का झाली? वाचा इनसाईड स्टोरी

भंडारा पालक मंत्री: भंडाऱ्यात संजय सावकारे (भाजप) हे पालकमंत्री असताना त्यांच्या जागी पंकज भोयर भाजप यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भाजप नेतृत्त्वाने या माध्यमातून एका दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे. संजय सावकारे (Sanjay Savkare) यांचा मतदारसंघ जळगाव जिल्ह्यातील भुसावळ असल्याने अत्यंत लांबचा आहे. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळाल्यापासून ते भंडाराचा पालकमंत्री (Bhandara News) असण्यासाठी फारसे इच्छूक नसल्याची चर्चा आहे. पंकज भोयर हे कुणबी समाजाचे असल्याने आणि भंडाऱ्यात मोठ्या प्रमाणावर कुणबी मतदार असल्याने अप्रत्यक्षरीत्या सामाजिक समीकरण सांभाळण्यात आले आहेत का? असा प्रश्नही या तडकाफडकीच्या बदलीनंतर निर्माण झाला आहे. एवढेच नाही तर आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर डोळा ठेवून भाजपची (BJP) ताकद वाढविण्याच्या दृष्टीने तसेच भंडारा जिल्ह्यात भाजपची अप्रत्यक्षपणे पूर्ण धुरा सांभाळणाऱ्या परिणय फुके यांच्यासोबत आवश्यक समन्वय साधण्याच्यादृष्टीने ही पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली असल्याची माहिती आहे.

संजय सावकार हे भंडाऱ्याचे पालकमंत्री असूनही जिल्ह्यात फक्त झेंडा टू झेंडा म्हणजे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला यायचे. त्यामुळे भंडाऱ्यात त्यांची ओळख झेंडा मंत्री अशी होती. भंडाऱ्यात काही दिवसांपूर्वी निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनंतरही ते भंडाऱ्यात आले नव्हते.. परिणामी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता. पालकमंत्री सावकारे हे भुसावळ त्यांचा मतदारसंघ सांभाळून भंडाऱ्याला वेळ देण्यात ते कमी पडले. डीपीडीसीच्या बैठकीमध्ये ते यायचे. मात्र, इतर दैनंदिन प्रशासनिक कामाकडे त्यांचा दुर्लक्ष व्हायचे. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जिल्ह्यात हळूहळू ताकद वाढायला लागली होती. त्यामुळे भंडारा जिल्ह्याची जाण असणाऱ्या जवळच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री करावा, अशी अशी सातत्याने केली जात होती. त्यामुळेच वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री पद सांभाळणारे भाजपचे पंकज भोयर यांच्याकडे भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Bhandara News: भंडाऱ्यात पालकमंत्री का बदलला?

* पालकमंत्री सावकारे म्हणून ते पूर्णकाळ उपलब्ध नसायचे
* झेंडा टू झेंडा (15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी) ते भंडाऱ्यात यायचे.
* भंडाऱ्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीनंतरही ते भंडाऱ्यात आले नव्हते.
* यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पालकमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झाला होता.
* भंडारा जिल्ह्याची जाण असणाऱ्या जवळच्या जिल्ह्यातील मंत्र्यांना पालकमंत्री करावा, अशी नागरिकांची ओरड होती.
* पालकमंत्री संजय सावकारे हे जिल्हा विकासाबाबत ठोस निर्णय घेण्यात सक्षम ठरले नाही.
* पालकमंत्री सावकारे हे जळगाव इथून येत होते. भंडाऱ्याला वेळ देण्यात ते कमी पडले आणि यामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र
* भोंडेकर यांची जिल्ह्यात हळूहळू ताकद वाढायला लागली होती.
* आगामी नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपची ताकद वाढविण्याच्यादृष्टीने पंकज भोयर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Buldhana Guardian Minister: बुलढाण्यातील नागरिक पालकमंत्री मकरंद पाटलांच्या कारभाराला वैतागले

जिल्ह्यात भाजपचे चार आमदार राष्ट्रवादीचा (अ प) एक आमदार, शिंदे गटाचा एक तर उबाठाचा एक आमदार अशी परिस्थिती असताना आधीपासून जिल्ह्याला राष्ट्रवादीचे मकरंद पाटील हे पालकमंत्री मिळाल्याने जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते काहीसे नाराज आहेत. मकरंद पाटील हे सातारा जिल्ह्यातील वाई मतदार संघाचे लोकप्रतिनिधी असल्याने ते बुलढाणा जिल्ह्याला कमी वेळ देत आहेत. याशिवाय जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे मेहकर चिखली, लोणार सिंदखेड राजा, बुलढाणा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाला आहे. मात्र, अद्यापही पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आढावा घेतलेला नाही. त्यामुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांसह राजकीय पदाधिकारी ही नाराज आहेत. अशातच शेजारील जळगाव जिल्ह्यातील भुसावळचे संजय सावकार यांना सह पालकमंत्री पद देण्यात आले . यामुळे जिल्ह्याला किती न्याय मिळेल हे आता आगामी काळातच समजणार आहे.

https://www.youtube.com/watch?v=GN9SB5TEBPG

आणखी वाचा

भाजपने भंडाऱ्यात भाकरी फिरवली, संजय सावकारेंची अचानक पालकमंत्रीपदावरुन उचलबांगडी, पंकज भोयर नवे पालकमंत्री

आणखी वाचा

Comments are closed.