हायकोर्टाचा आदेश येताच गुणरत्न सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया, मनोज जरांगेना डिवचलं

मनोज जारानरंगे पाटील आणि गुणरात्ना सादावर्ते: मुंबईतील आझाद मैदानावर पूर्वपरवानगीशिवाय कोणालाही आंदोलन करता येणार नाही, असा आदेश मंगळवारी उच्च न्यायालयाने दिला. या निर्णयामुळे मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडक मोर्चा घेऊन येणाऱ्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या इराद्यांना सुरुंग लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनी मनोज जरांगे यांना डिवचले आहे. मनोज जरांगे यांना आता डंके की चोटपर आझाद मैदानात नो एन्ट्री असेल. त्यांनी न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांना सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते, असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला.

मुद्दा असा आहे, न्यायालयापेक्षा कोणीही मोठं नाही. जरांगेही कायद्यापेक्षा आणि संविधानापेक्षा मोठा नाही. उच्च न्यायालयात दोन याचिका आहेत, एक जनहित याचिका आणि दुसरी माझी याचिका. मुंबई उच्च न्यायालयाने यापैकी एका प्रकरणाच्या सुनावणीत आझाद मैदानावर पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करता येणार नाही, असे निर्देश दिले आहेत. जे कोणी जरांगेंचे गॉडफादर, मसिहा किंवा मास्टरमाईंड असतील त्यांनी आता जरागे यांना सांगावं की, आता नो एन्ट्री इन आझाद मैदान. डंके की चोटपर असा हा आदेश आहे. तो प्रत्येकाला लागू आहे, असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

श्रीट्टा आरक्षण: लिंग सत्तारवार्टिस शस्त्रक्रियेद्वारे तुटलेले आहे

आता मनोज जरांगेला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही. कोणाला काय वाटतं हे महत्त्वाचे नाही. मनोज जरांगे हा काय एवढा मोठा नाही, तो नियम आणि कायद्यापेक्षा मोठा नाही. जरांगेला कोर्टाचा आदेश ऐकावा लागेल. सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे ओएसडी जरांगेला भेटायला जाणे हा लोकशाही प्रक्रियेचा भाग आहे. मनोज जरांगे ज्याप्रकारे बेकायदा आणि परवानगी नसताना बोलत आहेत, लोकांची आई-बहीण काढत आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या याचिकेत टाकल्या आहेत. हे गंभीर गैरवर्तन आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन झाल्यास सहा महिने शिक्षा होऊ शकते. आझाद मैदानात दोन आठवडे काही करायचं नाही, न्यायालयाचा निकाल हा सर्वंकष असतो. तो सगळ्यांना बंधनकारक असतो. हे मनोज जरांगेंनी आपल्या डोक्यात घालून घ्यावं, असेही गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=Lipysnbvco8

आणखी वाचा

मोठी बातमी : आझाद मैदानात आंदोलन करायचं असेल तर आधी परवानगी घ्या, हायकोर्टाचे मनोज जरांगेंना निर्देश

…तर तीन लाख ट्रक गुलालाने फडणवीसांचा बंगला रंगवून टाकतो, ओसएडींना मनोज जरांगे काय काय म्हणाले?

आणखी वाचा

Comments are closed.