गणेश चतुर्थीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद असणार? बँकांना सुट्टी असणार का? जाणून घ्या अपडेट

स्टॉक मार्केट न्यूज मुंबई: जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक किंवा ट्रेडिंग करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. या आठवड्यात शेअर बाजारात कामकाज केवळ चार दिवस   सुरु राहणार आहे. साधारणपणे पाच दिवस शेअर बाजारात कामकाज सुरु असतं. मात्र, 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीला शेअर बाजाराला सुट्टी असेल. म्हणजेच 27 ऑगस्टला गुंतवणूकदार शेअर खरेदी करु शकणार नाहीत किंवा विकू शकणार नाही. ट्रेडिंग संदर्भातील कोणताही व्यवहार होणार नाहीत.

गणेश चतुर्थीला शेअर बाजार बंद राहणार

देशाच्या अंतर्गत, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ पाहण्यासाठी बाजारपेला सुट्टी अनश्यनम बंद आहे. परदेशी शेअर बाजार सर्वरानपाने सूरु रहील. देशांतर्गत बाजारात होन्या घादामोंडी सुट्टीचा अर्थ असा नाही की आंतरराष्ट्रीय बाजारपेठही बंद राहतील. परदेशी शेअर बाजारपेठ सामान्यपणे खुली असेल आणि तेथील चळवळीचा परिणाम भारतीय बाजाराच्या पुढील व्यापार दिवशी निश्चितच दिसून येतो.

बँकांना कुठं सुट्टी असणार?

बँकांचा विचार केला असता काही ठिकाणी सुट्टी असणार नाही. मुंबईअहमदाबाद, भुवनेश्वर, पणजी, विजयवाडा आणि हैदराबादमध्ये बँकांना सु्ट्टी असेल. या राज्यांमध्ये रोख रक्कम काढणं, पैसे जमा करणं, कर्ज प्रक्रिया आणि चेक क्लिअरन्स सारख्या सेवा प्रभावित होतील.

यापूर्वी 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिवसानिमित्त शेअर बाजार बंद होता. येत्या काळात 2 ऑक्टोबरला गांधी जंयती, 21 आणि22 ऑक्टोबरला दिवाळीनिमित्त सुट्टी असेल. दिवाळीच्या दिवशी परंपरेनुसार मुहूर्त ट्रेडिंग 1 तास सुरु राहील. याशिवाय 5 नोव्हेंबर प्रकाश गुरुपर्व, 25 डिसेंबरला ख्रिसमला शेअर बाजार बंद राहील.

(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)

आणखी वाचा

Comments are closed.