निष्काळजीपणा! टायफॉईड झालेल्या 10 वर्षांच्या मुलाला डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचे औषध दिले
ठाणे : कल्याण आधारवाडी चौकातील मनोमेय मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. टायफॉईड आणि निमोनियाची लागण झालेल्या दहा वर्षाच्या मुलाला उपचार करून या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र संबंधित डॉक्टरने या मुलाला टायफाईड निमोनियाच्या औषधांसह दुसऱ्याच रुग्णाची औषधे देखील प्रीCleteिप्शन मध्ये लिहून दिली. मुलाचे नातेवाईक मुलाला घेऊन दुसऱ्या डॉक्टरकडे इंजेक्शन घेण्यासाठी गेले असता हा प्रकार उघडकीस आला. जर ही औषधं या मुलाने घेतली असती तर त्याच्या आरोग्याला अपाय होण्याची शक्यता होती. वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने पुढील अनर्थ टळला.
घडलेल्या प्रकारानंतर या दहा वर्षे मुलाच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून हलगर्जीपणा करणाऱ्या संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली. तर घडल्या प्रकाराबाबत मनोमेय हॉस्पिटल प्रशासनाने देखील चूक मान्य केली. चुकीचे औषध दिल्याचं लक्षात येताच वेळीच मुलाच्या नातेवाईकांना औषध न देण्याचे कळवल्याचे सांगितले.
मुलाला टायफॉईडची लागण
कल्याण पश्चिम परिसरात राहणारा दहा वर्षाचा सिद्धार्थ गायकवाड याला टायफॉईड आणि निमोनियाची लागण झाली होती. त्याला कल्याण आधारवाडी चौक परिसरातील मनोमेय या रुग्णालयात 23 ऑगस्टला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 25 ऑगस्टला सिद्धार्थला या रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. एसकेयावेळी संबंधित डॉक्टरांनी त्याला काही औषध लिहून दिली.
डायबेटिस आणि रक्त पातळ होण्याचे औषध दिले
या औषधांच्या प्रीस्क्रिप्शन मध्ये एका दुसऱ्या रुग्णाचे देखील औषध लिहून देण्यात आले सिद्धार्थच्या कुटुंबीयांनी प्रीस्क्रिप्शनवर दिलेले औषध विकत घेतली आणि ते घरी गेले. मंगळवारी सकाळी मुलाला इंजेक्शन देण्यासाठी ते एका दुसऱ्या डॉक्टरकडे गेले असता त्या डॉक्टरने हे प्रीस्क्रिप्शन वाचले.
आत्मािस्क्रीप्शनमधील औषध पाहून त्याला धक्काच बसला. टायफॉईड आणि निमोनियाच्या औषधांसह डायबेटीस आणि रक्त पातळ करण्याचे देखील औषध त्या प्रिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आले होते. त्याने याबाबत तमहात्काळ कुटुंबीयांना माहिती दिली.
डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी
मुलाच्या कुटुंबीयांनी याबाबत मनोमेय रुग्णालयात जाऊन गोंधळ घातला. मुलाच्या उपचारात निष्काळजीपणा करत चुकीचे औषध देणाऱ्या संबंधित डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर याबाबत मनोमेय रुग्णालय प्रशासनाचे डॉ. सनी सिंग यांनी संबंधित डॉक्टरकडून चुकून दुसऱ्या रुग्णाचे देखील औषध या दहा वर्षाच्या मुलाच्या प्रीस्क्रिप्शन मध्ये लिहिण्यात आल्याचे सांगितले.
झालेली चूक कबूल करत याबाबत कुटुंबीयांनाही ती औषधं न घेण्याबाबत कळविण्यात आल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केलं.
या घटनेमुळे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अशा गोंडस नावाखाली मोठमोठे रुग्णालयं थाटली जातात. अशाच प्रकारे थाटण्यात आलेल्या मनमेय रुग्णालयातील डॉक्टरांचा हलगर्जीपणा, बेजबाबदारपणा समोर आला. अशा डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.