मनोज जरांगे मुंबईत धडकणार, सरकारच्या हालचाली वाढल्या; राष्ट्रीय ओबीसी महासंघानेही बोलावली बैठक

मनोज जारानरेंज पावेल: मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावं, यासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे अंतरवाली सराटीतून काल मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. थोड्याचवेळात मनोज जरांगे शिवनेरीवर दाखल होणार आहेत. रात्री दोन वाजता मनोज जरांगेंचं पारनेरमध्येही जंगी स्वागत करण्यात आलं. हजारो मराठा बांधवासह मनोज जरांगे मुंबईत आंदोलन करण्यावर ठाम आहेत. ओबीसीतूनच मराठा आरक्षण द्या, या मागणीसाठी मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. दरम्यान शिवनेरीवर दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आता राष्ट्रीय ओबीसी महासंघाने देखील तातडीची बैठक बोलावली आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तातडीने ही नियोजन बैठक बोलावली असल्याचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी माहिती दिली. दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईजिवंत धडकणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार मनोज जरांगेंनी केलाय.

ओबीसी समाजात भीतीचे वातावरण-

जरांगे पाटील मुंबईकडे  रवाना झाले असताना सरकारच्याही हालचाली सुरु झाल्या आहेत. ओबीसी अंतर्गत मराठा समाजाला आरक्षण दिले जाणार, असा सरकारने आम्हाला लेखी दिले आहे. मात्र ओबीसी समाजात भीतीचे वातावरण आहे. ओबीसी समाजाची ती भीती दूर करण्यासाठी व सरकार दबावात आले, तर आपण काय भूमिका घ्यायची हे आजच्या बैठकीत ठरणार असल्याचे बबनराव तायवाडे म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, असं मनोज जरांगे म्हणाले.

2. हैदराबाद गझेटियर लागू करा… 13 महिन्यापासून त्यांचा अभ्यासच सुरू आहे, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आम्हाला साताराबाँबे गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

3. सगे सोयरेचा अध्यादेश काढून दीड वर्ष झाले, तरी मराठा संयमी आहे. त्याची व्याख्या दिली आहे. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे.

4. सरसकट गुन्हे मागे घेणार होते. आमच्यावरच मार खाऊन केसेस झाल्या…अजून केसेस मागे घेतल्या नाहीत. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी बलिदान दिले आहेत. त्यांचे कुटुंब उघड्यावर आहे, असं मनोज जरांगे म्हणाले.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या…, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या बातम्या, VIDEO:

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

संबंधित बातमी:

Manoj Jarange On Devendra Fadnavis: मी स्वत: देवेंद्र फडणवीसांना फोन केलेला; नेमकं काय बोलणं झालेलं?, मनोज जरांगेंनी सगळं सांगितलं!

आणखी वाचा

Comments are closed.