2 तासांत मुंबई रिकामी करा…; आझाद मैदानात पोहोचताच मनोज जरांगे असं का म्हणाले?

मनोज जरेंगे मुंबई मोर्चा: मराठा आरक्षणसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु केलंय. आज सकाळी मोठं शक्तिप्रदर्शन करत मनोज जरांगेंनी मुंबई गाठली. मनोज जरांगेंसह हजारो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. आता डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय इथून हलायचं नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई न सोडण्याचा मनोज जरांगेंनी निर्धार केलाय. आंदोलकांनाही सरकारला, पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन मनोज जरांगेंनी केलं. तसेच मराठ्यांना शांततेचं आवाहन देखील मनोज जरांगे यांनी यावेळी केलं.

पुढील 2 तासांत मुंबई रिकामी करा-

आझाद मैदानावर ठरवल्याप्रमाणे आलो, उपोषण सुरु केलंय, अशी घोषणा मनोज जरांगेंनी केली. सरकार सहकार्य करत नव्हतं म्हणून मराठे मुंबईत आले. आंदोलनाला आधी परवानगी नव्हती. त्यानंतर सरकारने आंदोलनासाठी परवानगी दिली.  सरकारने सहकार्य केलं, आता आपणही सहकार्य करु, असं मनोज जरांगेंनी सांगितले. कोणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही. मराठा बांधवांनी गोंधळ घालायचा नाही, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. तसेच मोठ्या प्रमाणात याठिकाणी गर्दी झाली आहे. काही आंदोलकांनी नवी मुंबईतील वाशी येथे जावे, पुढील 2 तासांत मुंबई रिकामी करा…काहीजण वाशीत मुक्काम करा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं. मुंबईत आंदोलकांची अडचण होऊ नये, पावासाचे दिवसही आहे. त्यामुळे काही आंदोलकांनी मुंबई सोडून मुंबईच्या वेशीवर असलेल्या वाशीत आंदोलन सुरु करावे, असं आवाहन मनोज जरांगेंनी केले.

मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही- मनोज जरांगे

मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही,  असं मनोज जरांगे म्हणाले. पोलिसांना सहकार्य करा, असं मनोज जरांगेंनी सांगितले. आपण कोणाला बोलायला संधी द्यायची नाही. दारु प्यायची नाही. माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल असं वागू नका…याच आझाद मैदानात राहायचं आणि झोपायचं, असं मनोज जरांगे उपस्थित मराठा आंदोलकांना म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांच्या नेमक्या मागण्या कोणत्या? (What are the exact demands of Manoj Jarange Patil?)

1. मराठा कुणबी एक आहेत. याची अंमलबजावणी झाली पाहिजे,

2. हैदराबाद गांजेटियरने अंमलात आणले …साताराबाँबे गॅझेटियर लागू करावे.

3. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या…सगे सोयरे पोट जात म्हणून घ्या.

4. मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या.

5. आमचं कायद्यात बसणारे आरक्षण द्या.

https://www.youtube.com/watch?v=T5HP0GAXNTM

संबंधित बातमी:

Manoj Jarange Patil Speech In Azad Maidan: खाली बस्स, नाहीतर निघ इकडून…; आझाद मैदानात पोहचताच मनोज जरांगे काय काय म्हणाले?

आणखी वाचा

Comments are closed.