रोहित शर्माला संघातून बाहेर काढण्यासाठी BCCI ने रचला कट? ‘ब्राँको’ टेस्टवरून दिग्गज संतापला

टीम इंडिया ब्रॉन्को कसोटी: भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही दिवसांपासून ‘ब्राँको टेस्ट’ विषयी जोरदार चर्चा सुरू आहे. अशा वेळी टीम इंडियाचा माजी खेळाडू मनोज तिवारी याने केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. तिवारीने असा सनसनाटी आरोप केला आहे की, भारतीय संघात नुकताच लागू करण्यात आलेला नवा फिटनेस निकष ‘ब्रॉन्को टेस्ट’ हा फक्त काही खेळाडूंना, विशेषतः रोहित शर्माला संघाबाहेर करण्यासाठीच आणण्यात आला आहे.

‘ब्राँको’ टेस्टवरून मनोज तिवारी संतापला

एका वृत्तसंस्थेशी बोलताना तिवारी म्हणाला, “मला वाटतं की 2027 च्या वर्ल्ड कपपर्यंत विराट कोहलीला टीममधून बाहेर करणं कठीण होईल. पण रोहित शर्माला मात्र भविष्यातल्या योजनांमध्ये डावलले जात आहे. ब्राँको टेस्ट आणण्यामागचं हेच खरं कारण आहे. काही जण त्याला टीमचा भाग म्हणून पाहू इच्छित नाहीत.”

तिवारीने या नियमाची वेळ आणि उद्देशावरही प्रश्न उपस्थित केले.  तो म्हणाला,
“नव्या कोचच्या पहिल्याच मालिकेत ही टेस्ट का आणली गेला नाही? हा निर्णय नेमका कुणाचा होता? यामागे कोण आहे? अजूनही या प्रश्नांची उत्तरं मिळालेली नाहीत. जर रोहितने आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष दिलं नाही, तर हा टेस्ट त्याच्या कारकिर्दीत मोठा अडथळा ठरू शकतो.”

ब्राँको टेस्ट म्हणजे काय?

‘ब्राँको टेस्ट’ हा अत्यंत कठीण आणि हाय-इंटेन्सिटी एंड्युरन्स टेस्ट आहे, जी साधारणतः रग्बी सारख्या खेळांमध्ये घेतली जाते. यात खेळाडूला कोणत्याही ब्रेकशिवाय सतत धावावं लागतं. यामध्ये 20 मीटर, 40 मीटर आणि 60 मीटर अशा शटल-रन्स कराव्या लागतात. हे पाच वेळा पुन्हा करावं लागतं. म्हणजे एकूण 1200 मीटरची धाव. अव्वल दर्जाचे खेळाडू हा टेस्ट साधारण 6 मिनिटांत पूर्ण करतात.

‘ब्राँको टेस्ट’वर एबी डिव्हिलियर्स काय म्हणाला?

स्टार क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स याने पण ‘ब्राँको टेस्ट’ या नव्या फिटनेस चाचणीबद्दल मत व्यक्त केले. त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना एबीडी म्हणाला, “मला पहिल्यांदा ही टेस्ट कोणीतरी सांगितली तेव्हा मी विचारलं, ‘ब्रॉन्को टेस्ट म्हणजे नेमकं काय?’ पण जेव्हा त्यांनी समजावून सांगितलं, तेव्हा मला लगेच लक्षात आलं की ही तर तीच टेस्ट आहे जी मी 16व्या वर्षापासून करत आलो आहे.”

या टेस्टतील अनुभव सांगताना डिव्हिलियर्स पुढे म्हणाला, “आमच्याकडे दक्षिण आफ्रिकेत याला ‘स्प्रिंट रिपीट अॅबिलिटी टेस्ट’ म्हणतात. ही खरंच सर्वात कठीण टेस्ट आहे. मी ती अनेकदा दिली आहे. विशेषतः थंडगार हिवाळ्यातील सकाळी, जेव्हा ऑक्सिजन कमी असतो. कारण आमचं उंचीवर असलेलं ठिकाण समुद्रसपाटीपासून तब्बल 1500 मीटर उंच आहे. अशा वेळी श्वास घ्यायलाही त्रास होतो.”

हे ही वाचा –

Harbhajan Singh slapping Sreesanth : सर्व कॅमेरे बंद झाले होते, तरी 18 वर्षांनंतर हरभजन सिंगने-श्रीसंतला कानाखाली मारलेला Unseen Video व्हायरल, उडाली खळबळ

आणखी वाचा

Comments are closed.