‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ कुठे आहेत? पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुण्यात रक्तरंजित होळी; रोहित प

पुणे गुन्हेगारीवर रोहित पवार: पुणे शहरात गणेशोत्सवानिमित्त पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 05) पोलीस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शहराच्या मध्यवर्ती भागातून रूट मार्च काढून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. मात्र, या बंदोबस्ताच्या केवळ दोन तासांनंतरच नाना पेठ परिसरात टोळीयुद्धाला हिंसक वळण लागले आणि रक्तरंजित थरार घडला. गेल्या वर्षी 1 सप्टेंबर रोजी आंदेकर टोळीचा आधारस्तंभ आणि माजी नगरसेवक वनराज आंदेकर (Vanraj Andekar) याचा खून करण्यात आला होता. याच प्रकरणात आरोपी असलेल्या गणेश कोमकर (Ganesh Komkar) याचा मुलगा आयुष कोमकरची (Ayush Komkar) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर संताप व्यक्त केलाय.

रोहित पवार यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की,  लाखो भक्तांच्या उपस्थितीत जगातील सर्वात मोठा गणेशोत्सव पुण्यात साजरा होत असताना टोळीयुद्धाचा भडका उडतो. एक टोळी दुसऱ्यावर धडधडीतपणे गोळ्या चालवते आणि पोलिसांच्या नाकावर टिच्चून पुण्यात रक्तरंजित होळी खेळली जाते. प्रचंड दहशतीखाली असलेला सामान्य माणूस जीव मुठीत धरून बसलाय. अशा परिस्थितीत लोक विचारतायेत कुठे आहेत ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’? असे त्यांनी म्हटले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

1 सप्टेंबर 2024 रोजी, वर्चस्वाच्या वादातून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा बदला घेण्याची तयारी आंदेकर टोळीने सुरू केली होती, अशी माहिती पोलिसांना तीन दिवसांपूर्वीच मिळाली होती. आंबेगाव पठार भागात टोळीने रेकी केल्याचंही उघड झालं होतं, त्यानुसार पोलिसांनी कारवाई केली होती. मात्र, सर्व अंदाज फोल ठरवत, हल्ला थेट पुण्याच्या मध्यवर्ती नाना पेठ परिसरात घडवून आणण्यात आला. गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकर क्लासवरून येऊन त्याच्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये थांबला असताना त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, आरोपींनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

https://www.youtube.com/watch?v=2nf6xdz-iky

आणखी वाचा

Pune Crime Ayush Komkar: वनराज आंदेकरच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, आंदेकर-कोमकर टोळीयुद्धात नातवाचा बळी, गणेश विसर्जनाच्या पुर्वसंध्येला काय काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.