अजित पवारांनी उगाच नाकाने कांदे सोलू नये, नैतिकता पाळायची म्हटलं तर…; संजय राऊतांचा घणाघात
अजित पवार वर संजय राऊत: सगळ्याजिवंत आधी महत्त्वाचा विषय इतकाच आहे तेबेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला. ज्या अर्थी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला, तर ते त्यांचीच माणसं होती. ते कार्यकर्ते असू शकतात आणि बेकायदेशीर कामाला संरक्षण द्या, हे सांगण्यासाठी तर फोन केला. अजित पवार नेहमी त्यांच्या भाषणामध्ये सांगत असतात मी कोणतेही नियमबाह्य काम करत नाही. नियामत जर बसेल नसेल तर मी हो म्हणत नाही. त्यांचा अनेक गोष्टी आहेत. तर पोलिसांनी त्यांच्या बेकायदेशीर कामांना संरक्षण द्यावं, कारवाई करू नये म्हणून ते पोलीस अधिकाऱ्यांची वाद घालत होते.
याला तणाव म्हणत नाहीत, दादागिरी म्हणतात. अशा गुंडांना सध्याचे सरकार, मी अजित पवार म्हणत नाही. पण जवळजवळ अर्धा मंत्रिमंडळ अशा कामांना संरक्षण देतात. अजित पवारांना यासंदर्भात गुन्हेगार आम्ही ठरवत नाही, पण अजित पवारांनी उगाच नाकाने कांदे सोलू नये. ते जे बोलत असतात, भाषणा करत असतात, लोकांना ज्ञान देत असतात, त्यात तुमचेही पाय मातीचेच आहे. अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे विशेषआणि संजय राऊतांनी केली आहे?
याला तणाव म्हणत नाहीत, दादागिरी म्हणतात – संजय राऊत
चुकीचं काम करणाऱ्या लोकांना टायर वरती उलट करून मारा, बारामतीच्या सभेत ते सांगत असतात. मुख्यमंत्री नियमाजिवंत बसत नसेल आणि इतका मोठा अनुभवी माणूस, सहा-सात वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले नेते त्यांना हे समजून आहे. ज्यांनी मला फोन केला आहे, काय काम सांगतात, कोणतं काम सांगतात ते पोलीस अधिकाऱ्यांना सांगताहेत की आमच्या बेकायदेशीर कामांना संरक्षण द्या आणि कोणता तणाव तिकडे निर्माण झाला होता? असा प्रश्न विशेषआणि संजय राऊतांनी यावेळी विचारला. तर पोलिसांनी त्यांच्या बेकायदेशीर कामांना संरक्षण द्यावं, कारवाई करू नये. म्हणून ते पोलीस अधिकाऱ्यांची वाद घालत होते. याला तणाव म्हणत नाहीत, दादागिरी म्हणतात. पोलीस अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र बघा म्हणत आहेत. मग आत्तापर्यंत तुम्हाला माहित नव्हतं च्या? ही परत दुसरी धमकी आहे.
त्या महिला अधिकाऱ्याचं काय चुकलं?
पहिली धमकी अजित पवारांनी दिली आणि दुसरी धमकी जर तुम्ही आमच्या नेत्याबद्दल काही बोलाल तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात काम करू देणार नाही, हि आहे. हे त्या आमदाराचं पत्र सांगतय. यूपीएससीला पत्र लिहितात त्या अधिकाऱ्याची चौकशी करा, का तर त्याने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना नियम आणि कायदा काय असतो हे सांगितलं. जे की त्याचं काम आहे. जे त्याचं काम आहे आयएएस, आयपीएस ज्याला भारतीय प्रशासकीय प्रशासकीय सेवा म्हणतात त्यात काम करणाऱ्या प्रत्येकाचे काम आहे. जर मंत्री, राज्यकर्ते चुकत असतील तर नियम काय आहे, संविधान काय आहे, हे दाखवून देणं काम आहे. त्या महिला अधिकाऱ्याचं काय चुकलं? असेही संजय राऊत म्हणाले?
….तर महाराष्ट्रातील 90% मंत्रिमंडळ खाली होईल
नैतिकेचा मुद्दा असेल आणि महाराष्ट्रात नैतिकता पाळायची म्हटलं तर महाराष्ट्रातील 90% मंत्रिमंडळ खाली होईल. शिंदे गटाचे सगळे मंत्री घरी जातील. नैतिकतेच्या मुद्द्यावर अजित पवारांचे सर्व मंत्री अजित पवारांचा घरी जातील. प्रत्येकावर आरोप आणि गुन्हे आहेत. प्रत्येक जण आजही सरकारमध्ये बसून बेकायदेशीर काम करत आहे. कालची तर गोष्ट सोडून द्या, नैतिकेच्या मुद्द्यावर करायचं म्हटलं तर निम्मम मंत्रिमंडळ हे 24 तासात घरी जायला पाहिजे. असेही संजय राऊत म्हणाले?
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.