भुजबळ मंत्रिमंडळाच्या बैठकीला आजही गैहजर राहण्याची शक्यता; सरकारला कोर्टात खेचण्याच्या तयारीत
छगन भुजबाल: राज्य मंत्रिमंडळाची (Maharashtra Cabinet Meeting) आज (9 सप्टेंबर) महत्वाची बैठक होणार आहे. दरम्यान, मागील मंत्रिमंडळ बैठकीवर मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार का? आणि उपस्थित राहिल्यास ओबीसींच्या आरक्षणासंदर्भात काय नेमके मुद्दे उपस्थित करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्य सरकारने जारी केलेल्या हैदराबाद गॅझेटियरच्या जीआरविरोधात छगन भुजबळ आक्रमक झाले असून, ते सरकारला कोर्टात खेचण्याचा तयारीत आहेत. दोन दिवसात मुंबई हायकोर्टात ते याचिका देखील दाखल करणार आहेत, या सगळ्या अनुषंगाने बैठकीत काय पडसाद उमटणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. छगन भुजबळ हे सर्व ओबीसी नेत्यांच्यावतीने उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून छगन भुजबळ यांची विविध वकिलांसोबत चर्चा सुरु आहे. न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी ओबीसी समाजाकडून कागदपत्रांची जुळणी सुरु होती. ही कागदपत्रे जमा झाल्यानंतर आता छगन भुजबळ हे न्यायालयात मराठा आरक्षणाच्या नव्या शासन आदेशाविरोधात दाद मागणार आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये छगन भुजबळ हे हायकोर्टात याचिका दाखल करतील, अशी माहिती आहे.
छगन भुजबळ प्रचंड नाराज-
मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील आणि महायुतीच्या मंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आझाद मैदानात जाऊन भेट घेतली होती. त्यांच्याशी वाटाघाटी केल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा जीआर काढला होता. यानंतर छगन भुजबळ प्रचंड नाराज झाले होते. या निर्णयानंतर छगन भुजबळ हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही उपस्थित राहिले नव्हते. त्यामुळे छगन भुजबळ यांंच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या होत्या. राज्य सरकारच्या नव्या जीआरमुळे संपूर्ण मराठा समाज ओबीसीमध्ये येईल, असा दावा मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. मात्र, आता छगन भुजबळ यांनी या जीआरला न्यायालयात आव्हान दिल्याने आता पुढे काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
छगन भुजबळांच्या नाराजीची कारणं काय?
ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेटियर लागू करत काढण्यात आलेल्या जीआर वरून मंत्रिमंडळ बैठकीवर मागील आठवड्यात बहिष्कार टाकला होता. कोणत्याही परिस्थिती मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नको अशी भुजबळांची भूमिका आहे. यासाठी मंत्री भुजबळ येत्या 2 दिवसांत कोर्टात जाणार आहेत आणि याचिकेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडणार आहेत. याचिकेच्या माध्यमातून हैदराबाद गॅझेटमधे मराठा आणि कुणबी वेगळे आहेत याबाबत नोंदी आहेत हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.
https://www.youtube.com/watch?v=tfjrslnsekc
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.