चिडविण्याच्या कारणावरून मेंढपाळाला दगडाने ठेचून संपवलं, नंतर डोंगर शिवारात दबा धरून बसला

बीड गुन्हा: बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात घडलेल्या मेंढपाळाच्या हत्येचं गूढ अखेर उलगडलं आहे. चार दिवसांपूर्वी दगडवाडी शिवारात दीपक बिल्ला (मूळ गाव मध्य प्रदेश) या मेंढपाळाचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. सुरुवातीला हत्या का आणि कोणाकडून झाली याबाबत पोलिसांसमोर मोठं कोडं उभं राहिलं होतं. मात्र, तपासाची चक्र फिरवत अखेर पोलिसांनी आरोपीला अटक करून या हत्येचं रहस्य उलगडलं आहे.

केवळ चिडविण्यावरून झाला खून

पोलिस तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. दीपक बिल्ला याची हत्या त्याच्यासोबत मेंढपाळीचं काम करणाऱ्या विलास मोरे या साथीदारानेच केली. केवळ सतत चिडविणं आणि बोलण्यातून झालेला राग यामुळे त्याने हा टोकाचा निर्णय घेतला. संतापाच्या भरात विलास मोरे याने दगड उचलून दीपकच्या डोक्यावर वार करत त्याचा खून केला. यात दीपकचा जागीच मृत्यू झाला.

चार दिवस डोंगरशिवारात दबा

घटनेनंतर आरोपी विलास मोरे घटनास्थळावरून फरार झाला. तो पाटोदा तालुक्यातील डोंगर शिवारात लपून बसला होता. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचला. चार दिवसांच्या सततच्या शोधमोहीमेनंतर अखेर पोलिसांच्या हाती तो लागला. पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याच्याकडून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांचा तपास

दीपक बिल्लाचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांसमोर हत्या गूढ होतं. सुरुवातीला कोणत्याही वैरातून हत्या झाल्याचा संशय उपस्थित झाला होता. मात्र, परिसरातील साक्षीदारांची माहिती आणि तपासाच्या धागेदोऱ्यांवरून अखेर आरोपी साथीदारापर्यंत पोलीस पोहोचले. पाटोदा पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

केवळ वादातून एकाची हत्या होणे हा प्रकार ऐकून गावकरी हादरले आहेत. मेंढपाळाच्या हत्येनं स्थानिकांमध्ये भीती आणि चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांच्या तातडीच्या कारवाईमुळे आरोपी जेरबंद झाल्याने मात्र ग्रामस्थांनी दिलासा व्यक्त केला आहे.

बदनामीच्या भीतीने बापाने 17 वर्षीय मुलीला संपवलं

जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील दावलवाडी गावात थरारक घटना उघडकीस आली आहे. गावातील एका पित्याने स्वतःच्या 17 वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. मुलीचे प्रेमसंबंध असल्याच्या चर्चेमुळे कुटुंबाची बदनामी होईल, या भीतीपोटी पित्याने हा टोकाचा निर्णय घेतल्याचे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे.

प्रेमसंबंधामुळे गावात बदनामी होण्याच्या भीतीने बापाने 17 वर्षीय मुलीला संपवलं, नंतर आत्महत्येचा बनाव रचला, जालन्यात थरारक घटना

आणखी वाचा

Comments are closed.