संजय राऊतांवर नाराज असल्याने ठाकरेंचे आमदार शिंदे गटात जाणार, शिवसेना नेत्याच्या दाव्यावर खुद्द
क्रुपल टुमानेवरील संजय राऊत: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे दोन आमदार सोडले तर सर्व आमदार शिवसेनेच्या (Shiv Sena) संपर्कात आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) आधी सर्वांचा पक्षप्रवेश होईल. सर्व आमदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर नाराज असल्याने ते शिवसेनेच्या संपर्कात असून दसऱ्यानंतर त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे, असा मोठा दावा शिवसेना शिंदे गटाचे आमदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी केला. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी कृपाल तुमाने यांच्यावर जोरदार पलटवार केलाय.
संजय राऊत म्हणाले की, हे कोण म्हणतंय ज्यांचा आम्ही लोकसभेला दारूण पराभव केला. तुम्ही या लोकांना का महत्व देतात? ही त्यांची निराशा आहे. ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपमध्ये विलीन व्हायला निघाला आहे ते दुसऱ्यांचे आमदार विलीन करण्याची भाषा करत आहेत. आज शिवसेनेत जे आमदार, खासदार आहेत ते शुद्ध, निष्ठावंत असे आहेत. ज्यांना जायचं होतं तो गाळ निघून गेलेला आहे. जे पैशाला विकत गेले, ईडी-सीबीआयच्या धमक्यांना घाबरून निघून गेले, त्यांनी आमच्या पक्षातल्या कडवट निष्ठावंतांवरती बोलणं म्हणजे शिवसेनेचा आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला.
तुमचं नशीब फुटलंय, ते बघा आधी
संजय राऊत पुढे म्हणाले की, हे जे कोणी आमदार आहेत ज्यांनी हे भाष्य केलेलं आहे ते कधीकाळी शिवसेनेचे खासदार होते. आम्ही त्यांना निवडून आणलेले आहे. आमच्याकडून गेल्यावर त्यांचा त्यांच्याच मतदारसंघात पराभव झाला. मग त्यांना मागच्या दाराने विधान परिषदेत आणण्यात आले. ते आता सांगत आहेत की हे फुटणार. तुमचं नशीब फुटलेले आहे ते बघा आधी, असा खोचक टोला त्यांनी यावेळी कृपाल तुमाने यांना लगावला. भविष्यात हा पक्ष भाजपमध्ये विलीन होणार आहे. त्या संदर्भात चर्चा आणि बोलणे सुरू झालेली आहे. हे बहुतेक त्यांना माहीत नसावे, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले.
https://www.youtube.com/watch?v=9trp0tn6t40
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.