ज्याने व्हिडिओ व्हायरल केला त्याचा कार्यक्रम करू.. कुर्डू ग्रामसभेत पदाधिकाऱ्याची थेट धमकी
सोलापूर गुन्हा: कुर्डू येथे प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या विरोधात ग्रामस्थांनी सर्वपक्षीय ग्रामसभा बोलावली होती. मात्र इथे बोलताना नितीन जगताप नावाच्या एका पदाधिकाऱ्याने थेट तुमचा तो व्हिडिओ ज्याने व्हायरल केला त्याची चौकशी करू आणि त्याचा कार्यक्रम करू असा उघड इशारा भाषणा दिल्याने खळबळ उडाली आहे. काल रात्री कुर्डू येथे प्रशासनाने बेकायदा मुरूम उपसा आणि अधिकाऱ्यांना दमबाजी मारहाण प्रकरणी जे गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावेत या मागणीसाठी ग्रामसभा बोलवण्यात आली होती. या सभेला सर्वच पक्षाचे ग्रामस्थ एकवटले होते. मात्र यावेळी भाषण करताना मोहिते पाटील गटाचा कार्यकर्ता असणाऱ्या नितीन जगताप यांनी भाषणात थेट व्हिडिओ व्हायरल करणाऱ्याचा कार्यक्रम करण्याची धमकी दिली आहे.
आजवर आपण मोहिते पाटील यांच्यासाठी काम करीत होतो मात्र त्यांनी आमच्या गावाला बीड ची उपमा दिल्याने आता त्यांच्यासोबत राहणार नसल्याचेही या नितीन जगताप यांनी सांगितले. यावेळी बोलताना बाबा तुमचा तू व्हिडिओ जाने व्हायरल केला त्याची खोलात जाऊन चौकशी करू आणि त्याला शोधून काढून कार्यक्रम करू असे आम्ही ठरविल्याचे या नितीन जगताप यांनी सांगितले आहे.
नेमके प्रकरण काय?
बेकायदा मुरूम उपसा प्रकरणी कुर्डू येथे कारवाईला आलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना थेट उपमुख्यमंत्र्यांचा फोन राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्ष बाबा जगताप यांनी लावून दिला होता. याच फोनवर बोलताना अजितदादांनी महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर कारवाईला आलेले तलाठी तहसीलदार यांच्यावरही ग्रामस्थांनी शिवीगाळ करत हल्ल्याचा प्रयत्न केला होता. हे सर्व व्हिडिओ समाज माध्यमात वायरल झाल्यावर खूप मोठी टीका राज्यभरातून सुरू झाली होती. नंतर राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेल्या आणि या गुन्ह्यात आरोपी असलेल्या बाबा जगताप याचा नशा करतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाल्याने खूपच खळबळ उडाली होती.
”व्हिडिओ ज्याने व्हायरल केला त्याचा कार्यक्रम करू”
काल झालेल्या ग्रामसभेत बाबा जगताप यांच्या नशा करतानाच्या त्या व्हिडिओला जाणे व्हायरल केले त्याची चौकशी करून कार्यक्रम करायचे ठरवले असल्याची धमकी या ग्रामसभेत दिल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. गावाला रस्त्याची गरज होती मात्र काही विघ्न संतोषी लोकांनी प्रशासनाची दिशाभूल केली आणि यातून हे सर्व घडल्याचा आरोप या ग्रामसभेत करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांवर केलेल्या चुकीच्या कारवाईचा निषेध करत हे कारवाई तातडीने मागे घेण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असून अन्यथा मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.