इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीत घसरण, ऑगस्ट महिन्यात गुंतवणूक 22 टक्क्यांनी घटली
मुंबई : भारतात म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दरमहा एसआयपीच्या माध्यमातून म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली जाते. जुलैमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये विक्रमी गुंतवणूक झाली होती. ऑगस्ट महिन्यातील म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीची आकडेवारी समोर आली आहे. त्या आकडेवारीनुसार ऑगस्ट महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक 22 टक्क्यांनी घटून 33430 कोटी रुपयांवर आली आहे. असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडियाकडून आकडेवारी जारी करण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्यात एसआयपी इन्फ्लो देखील घटला आहे. जुलै महिन्यात एसआयपीद्वारे 28464 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. तर, एसआयपीद्वारे 28265 कोटी रुपयांची गुंतवणूक एसआयपीद्वारे झाली आहे.
Equity Mutual Fund Investment : इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक
इक्विटी फंड कॅटेगरीत ऑगस्ट महिन्यात फ्लेक्सी कॅप फंडमध्ये 7679 कोटी रुपयांचा इनफ्लो आला. यानंतर मिडकॅप फंडमध्ये 5330 कोटी रुपयांचा इन्फ्लो आला.
ईएलएसएस मध्ये 59 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. ऑगस्ट महिन्यात लार्ज कॅप फंडमध्ये 2835 कोटी, स्मॉल कॅफ फंडमध्ये 4993 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. तर, सेक्टरल आणि थीमॅटिक फंडमध्ये 3893 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. दुसरीकडे न्यू फंड ऑफर मधील गुंतवणूक घटली आहे. ऑगस्ट महिन्यात 23 नवे फंड लाँच झाले. त्या माध्यमातून फंडने 2859 कोटी रुपये कमावले.
ओपन एंडेड डेट फंडसमध्ये 7980 कोटी रुपयांची गुंतवणूक ऑगस्ट महिन्यात झाली. भारतातील म्युच्युअल फंड इंडस्ट्रीत ऑगस्ट महिन्यात एकूण 52443 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. जुलै महिन्यात 1.8 लाख कोटी रुपये आले होते. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी असेट अंडर मॅनेजमेंटची रक्कम 75.2 लाख कोटी रुपये झाली आहे.
मिरे असेटमधील हेड ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड स्ट्रॅटेजिक अलायन्सेसचे सुरंजना बोर्थाकुर यांनी या आकडेवारीवर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की गेल्या काही मिन्यांमध्ये मिड कॅप आणि स्मॉल कॅप फंडचं मूल्यांकन महाग वाटत होतं. मात्र, या कॅटेगरीत सातत्यानं गुंतवणूक होत आहे. सलग दोन महिन्यांमध्ये या फंडमध्ये 10000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. यातून गुंतवणूकदारांचा दीर्घकालीन गुंतवणुकीचा दृष्टिकोन दिसून येतो.
इक्विटी म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक 42000 कोटींवरुन 33000 कोटी रुपयांवर आली आहे. मात्र, गेल्या महिन्यात मुख्य वाढ सेक्टोरल कॅटेगरीतून आली होती. ज्यात 7000 कोटींचे एनएफओ होते. हायब्रीड फंडमध्ये देखील घसरण झाली आहे. त्यातील इन्फ्लो 15000 कोटींवर आला आहे, असं बोर्थाकूर म्हणाले. एसआयपी स्थिर असणं बाजारासाठी चांगले संकेत आहेत, असं ते म्हणाले.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
आणखी वाचा
Comments are closed.