माढ्यातील वेणेगावच्या जय मल्हार कला केंद्राबाहेर गोळीबार,एकच बैठक लावण्यावरुन वादाचा भडका
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील कला केंद्रातील एका महिलेमुळं एका उपसरपंचानं आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच माढ्यातील वेणेगाव येथील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. गोळीबाराच्या या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. या घटनेत गोळीबार नेमका कोणी केला याची माहिती पोलिसांनी उद्याप उघड केलेली नाही.
जय मल्हार कला केंद्राबाहेर गोळीबार (Jay Malhar Kala Kendra Firing)
माढ्याच्या वेणेगाव येथील जय मल्हार कला केंद्राच्या बाहेर गोळीबाराची घटना घडली. या घटनेत एक जण जखमी झाला आहे.बार्शी येथे नुकत्याच कला केंद्रातील एका महिलेमुळं एका उपसरपंचानं आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर आज टेंभुर्णी जवळ पुन्हा धक्कादायक प्रकार घडला आहे. जय मल्हार कला केंद्रातील गोळीबाराच्या या घटनेत पायाला गोळी लागल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे.
या प्रकरणी टेभुर्णी पोलिसांनी पिस्टल ताब्यात घेऊन सुरज पवार याच्या सह अन्य तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. तर या घटनेत देवा बाळू कोठावळे असे जखमी झालेल्या त्या व्यक्तिचे नाव असून तो पंढरपूरच्या वाखरी गावचा रहिवाशी आहे.
एकच बैठक लावण्याच्या कारणावरुन हा वाद झाला.आणि या वादाचे रुपांतर टोकाच्या भांडणात झाले. या भांडणात थेट पिस्टलने देवा कोठावळेच्या डाव्या बाजूच्या मांडीवर गोळीबार करण्यात आला.यात देवा कोठावळे हा तरुण जखमी झाला आहे. या घटनेत नेमका गोळीबार कोणी केला हे अद्याप समोर आलेलं नाही. टेंभुर्णी पोलिसांनी त्या आरोपीचे नाव उघड केलेले नाही.
माढ्यातील वेणेगावच्या जय मल्हार कला केंद्रात एकच बैठक लावण्यावरुन ज्या दोन गटात वाद झाला. ते दोन्ही गट पंढरपूरच्या वाखरी गावातील असल्याची माहिती समोर आली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे.टेंभुर्णी पोलिसांनी 3 जणांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, 24 जुलै रोजी पुण्याच्या दौंड तालुक्यातील वाखरी येथील न्यू अंबिका या कला केंद्रात गोळीबार झाला होता.
आणखी वाचा
Comments are closed.