नातेवाईक गोविंद बर्गेंच्या गाडीपाशी पोहोचताच ‘त्या’ गोष्टींमुळे संशय आला, नर्तिका पूजा गायकवाडन
बीड क्राइम माजी उप -सरपंच आत्महत्या: बीडमधील गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (वय 34) यांनी मंगळवारी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. गोविंद बर्गे यांचे पारगाव कला केंद्रातील पूजा गायकवाड (वय 21) या नर्तिकेशी प्रेमसंबंध होते. याच प्रेमसंबंधातून गोविंद बर्गे (Govind Barge Murder) यांची स्वत:च्या कारमध्ये बसून कानशिलात गोळी झाडून आत्महत्या केली, अशी माहिती समोर आली होती. मात्र, याप्रकरणात आता गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. आमच्या माणसाचा घातपात झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणात लक्ष घालून नर्तिका पूजा गायकवाड (Dancer Pooja Gaikwad) हिच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांनी केली आहे.
गोविंद बर्गे यांनी पूजा गायकवाड राहत असलेल्या सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सासुरे गावात आत्महत्या केली. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या घरासमोरच गाडी लावून आत्महत्या केली. याठिकाणी पोलीस पोहोचले तेव्हा गोविंद बर्गे यांची गाडी लॉक होती. त्यामुळे पोलिसांनी लुखामालसा गावच्या सरपंचांना घडलेला प्रकार सांगून बोलावून घेतले. पोलिसांनी गोविंद बर्गे यांच्या नातेवाईकांना गाडीची दुसरी चावी घेऊन येण्यास सांगितले होते. बर्गे यांचे नातेवाईक आणि सरपंच घटनास्थळी पोहोचले तेव्हा गाडीची बॅटरी पूर्णपणे उतरली होती. तसेच गाडी लॉक होती आणि आतमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता. या गोष्टी अनपेक्षित होत्या. नातेवाईकांच्या सांगण्यांनुसार, गोविंद बर्गे हे जाताना कधी साधी काठीही सोबत घ्यायचे नाहीत. मग त्यांच्याकडे पिस्तुल कुठून आले? त्यांच्याकडे कधीही पिस्तूल नव्हते, असे बर्गे यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यामुळे याप्रकरणात घातपात झाल्याचा संशय बळावला आहे.
गोविंद बर्गे यांच्या मेहुण्याच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कालच नर्तिका पूजा गायकवाड हिच्यावर गुन्हा दाखल करुन तिला अटक केली होती. तिला न्यायालयात हजर केल्यानंतर तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पूजा गायकवाड हिने गोविंद बर्गे यांना आपल्या गावी बोलावून त्यांची हत्या केली, असा नातेवाईकांचा आरोप आहे. त्यामुळे पोलीस चौकशीत पूजा गायकवाड काय बोलणार, याविषयी उत्सुकता आहे.
Govind Barge Murder Case: नेमकं प्रकरण काय?
गोविंद बर्गे यांना तमाशा बघण्याचा नाद होता. ते अनेक कला केंद्रात जायचे. दीड वर्षांपूर्वी गोविंद बर्गे यांची थापडीतांडा येथील कला केंद्रात नर्तकी असलेल्या पूजा गायकवाड हिच्यासोबत ओळख झाली. कालांतराने गोविंद आणि पूजा यांच्यात मैत्री आणि नंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. गोविंद बर्गे हे पूजाला भेटण्यासाठी नियमितपणे पारगाव कला केंद्रावर जात होते. या दोघांचे प्रेमाचे नाते घट्ट झाल्यावर पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याकडून पावणेदोन लाखांचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने घेतले होते. गोविंद बर्गे यांनी पूजाच्या नातेवाईकांच्या नावावरही काही जमीन केली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये काहीतरी बिनसले होते. पूजा गायकवाड हिने गोविंद यांच्याशी बोलणे टाकले होते. तिने गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि माझ्या भावाच्या नावावर पाच एकर शेती करा, असा हट्ट गोविंद बर्गे यांच्याकडे धरला होता. आपली मागणी मान्य न केल्यास मी तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकीही पूजाने गोविंद बर्गे यांना दिल्याचे समजते. या सगळ्यामुळे गोविंद बर्गे प्रचंड दुखावले गेले होते. प्रेमात फसवणूक झाल्याने ते नैराश्याच्या गर्तेत ढकलले गेले होते.
गोविंद बर्गे हे पूजाला अनेकदा फोन करत होते. मात्र, ती त्यांचा फोन उचलत नव्हती, त्यांच्याशी एक शब्दही बोलत नव्हती. सोमवारी मध्यरात्री ते पूजा गायकवाड हिचं सासुरे येथील घरी आले होते. याठिकाणी दोघांमध्ये नेमके काय झाले, हे माहिती नाही. मात्र, दुसऱ्या दिवशी पूजा गायकवाडच्या घरापासून काही अंतरावर कारमध्ये गोविंद बर्गे यांचा मृतदेह मिळाला. कारचा दरवाजा लॉक करण्यात आला होता. पोलिसांनी कारचा दरवाजा उघडला तेव्हा आतमध्ये ड्रायव्हिंग सीटवर गोविंद बर्गे यांचा मृतदेह होता. त्यांनी डोक्याच्या उजव्या भागात कानशिलात गोळी झाडून घेतल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. गोविंद बर्गे यांच्या डोक्याच्या उजव्या भागातून गोळी शिरुन डाव्या बाजूने बाहेर पडली, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
https://www.youtube.com/watch?v=H3NHP3PEPR8
आणखी वाचा
Solapur Crime: जिच्या नादापायी बीडच्या उपसरपंचाने आयुष्य संपवलं ती पूजा गायकवाड कोण?
आणखी वाचा
Comments are closed.