मनोज जरांगेंच्या आंदोलनावेळी अदानीला किती टक्के महाराष्ट्र विकला? श्वेतपत्रिका काढा: नाना पटोले

नाना पॅटोल: मराठा आरक्षणाला (Maratha reservation) घेऊन भाजप सरकारनं (Bjp Govt) मराठा वर्सेस ओबीसी असा वाद लावला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या (Manoj jarange patil) आंदोलना दरम्यान राज्य सरकारनं अदानीला किती टक्के महाराष्ट्र विकला? याची श्वेतपत्रिका काढावी असे म्हणत काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. लोकांमधील उद्रेक जेव्हा बाहेर येईल तेव्हा नेपाळसारखं चित्र भारतात पाहायला मिळेल असेही पटोले म्हणाले. दोन भावांमध्ये युती झाल्यास महाविकास आघाडीमध्ये राहायचं की नाही हा निर्णय हायकमांड घेईल असे वक्तव्य काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केलं आहे.

रश्मी शुक्लाबाबत आम्ही आता वरच्या न्यायालयात जावू. हे सर्व कोणाच्या इशारावरून केलं होतं, हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत आम्ही न्यायालयीन लढा लढत राहू असे पटोले म्हणाले. कुठलाही प्रोटोकॉल नं पळता, कुठलंही निमंत्रण नसतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे प्रधानमंत्री नवाज शरीफ यांच्या वाढदिवसासाठी जावं आणि तिथे बिर्याणी खाऊन यावं असे पटोले म्हणाले.

मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्यात भाजपला यश आलं

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाला घेऊन महाराष्ट्रातील आणि केंद्रातील भाजपच्या सरकारने मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद लावण्यात ते यशस्वी झाले आहेत असी टीका पटोलेंनी केली. महाराष्ट्रातील मूळ जे प्रश्न होते शेतकऱ्यांचे होते, महागाईचे होते, बेरोजगारांचे होते, महाराष्ट्राच्या विकासाचे जे प्रश्न होते, भ्रष्टाचाराचे प्रश्न होते, हे सगळे प्रश्न मागे टाकायला भाजप सरकारला यश आलेलं आहे. जरांगे पाटलांच्या आंदोलना दरम्यान राज्य सरकारने अदानीला किती टक्के महाराष्ट्र विकला याची श्वेतपत्रिका यांनी आता काढावी. हे आमचं राज्य सरकारला आवाहन आहे असे पटोले म्हणाले. अन्यथा सरकारचा काळा आलेख हा आम्हाला राज्यातील जनतेला दाखवावा लागेल.

उद्रेक जेव्हा बाहेर येईल तेव्हा नेपाळ सारखं चित्र भारतात पाहायला मिळेल

दोन समाजांमध्ये भांडण लावून सरकार आपलं पाप लपवत आहे. हे कदाचित आम्ही सहन करणार नाही. सरकारचा असली चेहरा राज्यातील आणि देशातील जनतेसमोर आम्ही उघडा करु असेही पटोले म्हणाले. महाराष्ट्रात वोट चोरी झालेली आहे हे लपलेली नाही. जे काही मुद्दे आम्ही मतदानानंतर झाले ते मांडलेले आहेत त्याचे उत्तर अद्यापही निवडणूक आयोगानं दिलेलं नाही असे पटोले म्हणाले. राज्यकर्ते हे लोकांची मत चोरुन बेइमानींनं सत्तेत आले आहेत. लोकांमधील उद्रेक जेव्हा बाहेर येईल तेव्हा नेपाळ सारखं चित्र भारतात पाहायला मिळेल असेही पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

Bhandara : भंडारा जिल्हा बँकेत नाना पटोलेंच्या पॅनलचा पराभव, तर महायुतीतील प्रफुल्ल पटेलांच्या पॅनलचा 11 जागांवर दणदणीत विजय

आणखी वाचा

Comments are closed.