OBCचा लढा, लातूरच्या तरुणाची मांजरा नदीत उडी; मंत्री छगन भुजबळ कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार

मुंबई : राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलएफ आणि राजकारण तापलं असताना त्याचे पडसाद आता समाज जीवनावरही उमटताना दिसत आहे? अशातच ओबीसी (OBC) आरक्षण संपल्याच्या भीतीने एका तरुणाने लातूरच्या मांजरा नदीपात्रात उडी घेत स्वतःचा संपर्कवाय? हि दुर्दैवी घटना लातूर (Latur) जिल्ह्याच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावात घडलीय? तर भरत महादेव कराड (वय 35) असे किंवा तारुनाचं नाव असून ओबीसी आरक्षण (OBC Reservation) संपुष्टात येत असल्याच्या निषेधार्थ त्याने मांजरा नदीपात्रात उडी मारुन आत्महत्या केलीय?

मंत्री छगन भुजबळ कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार

दरम्यानया दुर्दैवी घटनेची माहिती मिळताच राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan bhujbal) यांनी दु: ख व्यक्त करत आज (शुक्रवार 12 सप्टेंबर 2025) तातडीने लातूर येथे आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे आज सकाळी 10 वाजता लातूर विमानतळ येथे आगमन होणार आहे. त्यानंतर ते रेणापूर तालुक्यातील वांगदरी गावातील स्वर्गीय भरत महादेव कराड यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहे.

परिसरात हळहळ, ओबीसी समाजातही तीव्र संताप

राज्यातील ओबीसी आरक्षण बचावचा लढाही तीव्र होताना दिसत असून भरत कराड ह्या ऑटोचालकाने आरक्षणाच्या लढाईत जीव देऊन शासनाचे लक्ष वेधले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून ओबीसी समाजातही तीव्र संताप पसरला आहे. भरत कराड हे रिक्षाचालक होते. रिक्षा चालवूनच ते उदरनिर्वाह करत होते. ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनातही ते गेल्या काही वर्षांपासून सक्रियपणे सहभागी झाले होते. सरकारने मराठा समाजाला हैद्राबाद गॅझेट लागू करून ‘कुणबी’ म्हणून ओबीसी आरक्षणात सामील करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ओबीसींचे आरक्षण संपुष्टात येईल, या निषेधार्थ त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे.

आत्महत्या लिहली पत्र

भरत कराड यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत, “मी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात सहभागी झालो. तरीही सरकारने ओबीसींचा घात करुन जीआर काढला. त्यामुळे मी जीवन संपवत आहे, माझ्या बलिदानानंतर तरी समाजाला न्याय मिळावा” असे त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे. भरत कराड यांच्या अंत्यसंस्कारावेळी गाव आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे”, “भरत कराड यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही” अशा घोषणा देत वातावरण संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, भरत यांच्या नंतर आई, पत्नी, तीन मुली व एक मुलगा असा परिवार असून कराड यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर मोठे संकट कोसळले आहे. त्यांच्या कुटुंबाकडे फक्त 10 ते 20 गुंठे जमीन असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर ओबीसी समाजात असंतोषाचे वातावरण असून शासनाच्या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा

आणखी वाचा

Comments are closed.