जो आमच्या नादी लागणार….आंदेकर गँगने आयुष कोमकरवर कशा गोळ्या झाडल्या; त्यादिवशी सोबतच असणाऱ्य
पुणे : नाना पेठ परिसरात ५ सप्टेंबरच्या रात्री झालेल्या टोळीयुद्धातून अवघ्या १९ वर्षांच्या आयुष कोमकरची निर्घृण हत्या झाली. वर्षभरापूर्वी झालेल्या वनराज आंदेकर हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने गणेश कोमकरच्या मुलगा आणि स्वतःचा नातू असणाऱ्या आयुषला टार्गेट केले, असे तपासात समोर आले. आयुषचा गुन्हेगारी जगताशी काहीही संबंध नसतानाही सूड उगवण्यासाठी ही हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत अत्यंत नियोजनबद्ध कट रचण्यात आला होता. आयुषवर गोळ्या झाडल्यानंतर परिसरात ‘टपका रे टपका, एक और टपका’ हे गाणे स्पीकरवर लावण्यात आले होते. त्यामुळे या हत्येची चर्चा संपूर्ण पुण्यात रंगली होती. ज्या रात्री ही घटना घडली, त्या वेळी आयुष आपला लहान भाऊ अर्णव कोमकरला क्लासमधून घरी आणायला गेला होता. अर्णवला खाली सोडल्यानंतर पार्किंगमध्ये गाडी लावत असताना अचानक मारेकऱ्यांनी आयुषवर गोळ्या झाडायला सुरुवात केली. जवळपास १२ गोळ्या झाडल्या गेल्या, त्यापैकी ९ गोळ्या थेट त्याच्या शरीरात घुसल्या.
हे सर्व थरारक क्षण आपल्या डोळ्यांनी पाहणारा अर्णव कोमकर एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला, “पहिल्या दोन गोळ्या लागताच भाऊ जमिनीवर कोसळला. मी काही क्षण मी गोंधळलो. त्यानंतर पोलिसांना यायला अर्धा तास लागला, तर रुग्णवाहिका जवळपास ४०-५० मिनिटांनी पोहोचली. तोवर बिल्डिंगमधील एक डॉक्टर आयुषला तपासत होते, पण काहीच उपयोग झाला नाही. आयुष बराच वेळ घटनास्थळीच पडून राहिला, रुग्णवाहिका बोलावण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र, ही पोलीस केस असल्याचे सांगण्यात आले. तोपर्यंत आयुषचा मृतदेह तिकडेच पडून होता, असे असे अर्णव कोमकरने सांगितले.
त्या दिवशी नेमकं काय घडलं?
त्यादिवशी आयुषने मला क्लासला सोडलं, त्यानंतर तो डॉक्टरकडे गेला. तिथून त्याने फोन केला होता. हार आणि प्रसाद आणायचा आहे का? हार आणि प्रसाद नाहीतर फक्त हार आणायचा आहे असं सांगितलं. त्यांनी फक्त हार घेतला. त्यानंतर तो तिथून मला घ्यायला आला. आम्ही पार्किंगमध्ये आलो. त्यावेळी दोघं जण पळत आले, अमन आणि यश पाटील आणि दोघेजण त्यांच्या मागे थांबलेली, जसा तो वळला तशी फायरिंग सुरू झाली. त्याच्यावर गोळ्या मारल्या. आमच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये सगळं झालं. आम्ही ज्या रोड वरून आलो होतो, तिथे कोणीच नव्हतं. आमच्या मागे पुढे कोणी नव्हतं. आम्ही जसं पार्किंगमध्ये आलो आणि उतरलो त्याने गाडी लावली त्यावेळी दोन पोरं पळत आली होती. त्यांनी फायरिंग केली.
पोलिसांना अर्धा तास लागला आणि ॲम्बुलन्सला यायला 45 ते 50 मिनिटे लागले
टपका रे टपका गाणं इथं नव्हतं लागलं, तर येताना लागलं होतं. आंदेकर चौकामध्ये लागलं होतं. ही घटना घडली त्यावेळी घरामध्ये मोठी बहीण आणि आई होती. जेव्हा त्याला गोळ्या लागल्या तेव्हा सोसायटीमध्ये एक डॉक्टर आहेत, त्यांना बोलावलं. ते ट्राय करत होते खूप रक्त जात होतं. पोलीस केस आहे पोलिसांना सांगा असं म्हणत होते, आणि ॲम्बुलन्स बोलावली, त्यानंतर पोलिसांना बोलावलं. पोलीस म्हणाले आम्हाला थोडा वेळ लागेल. पोलिसांना इथे यायला कमीत कमी अर्धा तास लागला आणि ॲम्बुलन्सला यायला 45 ते 50 मिनिटे लागले, जेव्हा आयुषला गोळ्या लागल्या तेव्हाच तो खाली पडलेला जमिनीवरती तो तसाच होता. जेव्हा त्यांनी गोळ्या झाडल्या तेव्हा ते काय बोलत नव्हते पण जायच्या वेळी ते बोलले इथे फक्त कृष्णा आंदेकर आणि बंडू अण्णा आंदेकर चालणार बाकी कोण नाही, जो आमच्या नादी लागणार त्याचं असंच होणार असं त्यांनी म्हटलं होतं.
आमची भांडण पाच वर्षांपूर्वीची होती
मामाच्या हत्या झाली तेव्हापासून ते कोणी आमच्याशी बोलले नाहीत. मामाच्या हत्येचा बदला घेणार असं ते तेव्हा म्हणाले होते, तेव्हा आणि आधी पण ते आमच्याशी काहीच नव्हते बोलले, आजोबा देखील कधी बोलत नव्हते. आम्ही त्यांच्याकडे कधी जात नव्हतो, आमची भांडण पाच वर्षांपूर्वीची होती. आम्ही त्यांच्याशी बोलत नव्हतो. पाच वर्षांपूर्वी बोलायचो सगळे तेव्हा सगळं चांगलं होतं, पप्पा आले होते ते बोलले घराकडे लक्ष दे, काय लागलं तर तू बघ, एवढेच बोलले बाकी काही नाही, ते पण दुःखात होते आणि रडत होते असंही आर्णवने बोलताना सांगितले.
नेमकं प्रकरण काय?
1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठमध्ये राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाली. या प्रकरणात गणेश कोमकर, संजीवनी कोमकर, जयंत कोमकर आणि इतरांसह 21 आरोपींना अटक करण्यात आली. आयुष कोमकरचा वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणात त्याचा कोणताही संबंध नसल्याचं पोलीस तपासातून उघड झालं.
वनराज आंदेकरच्या हत्येनंतर संतापलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याच्या अंत्यविधीवेळी शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतली होती. त्याचाच एक भाग म्हणून 1 सप्टेंबर रोजी प्लॅनही आखला होता. वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपींची रेकी करण्यात आली होती. पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि हा प्लॅन उधळला.गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आरती झाल्यानंतर नाना पेठेमध्ये गोळ्यांचा आवाज झाला. एकीकडे एका गणेश मंडळामध्ये डीजे सुरू होता, त्यामध्ये ‘टपका रे टपका, एक ओर टपका’ हे गाणं सुरू होतं. त्याचवेळी दुसरीकडे आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्यांच्या भाच्याला म्हणजे आयुष कोमकरला ठार केलं. या घटनेनंतर पोलीस कारवाई सुरू आहे.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.