गायछाप मिळायचे वांदे, ई-सिगारेट कुठून आणू?; IPS अंजना कृष्णा यांना अजितदादांचा फोन जोडून देणारे
बाबा जगटॅप कुर्दु मुरुम प्रकरण सोलापूर: माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन (Kurdu Murum Case) होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna) या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. यानंतर अजित पवार आणि आयपीएस अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. आता अजित पवारांना फोन लावून देणाऱ्या बाबा जगताप एबीपी माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.
बाबा जगताप काय म्हणाले?
अजितदादा सर्वसामान्यांचे फोन थेट उचलतात. त्यामुळे त्या दिवशी मीच अजितदादांना फोन लावून अंजना कृष्णा यांना दिला होता, असं बाबा जगताप म्हणाले. याबाबत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कॉन्फरन्स कॉलवर अजितदादांना जोडून दिल्याची माहिती पूर्णपणे चुकीचे आहे. काल कुर्डूवाडी पोलिसांनी देखील याचा सविस्तर तपास केला होता, अशी माहिती बाबा जगताप यांनी दिली.
आमच्या गावात गायछाप मिळायचे वांदे-
मी नशा करतानाचा व्हिडीओ हा एआय तंत्रज्ञानाने मला बदनाम करण्यासाठी बनवला आहे. दोन वर्षांपूर्वी कोविडच्या काळात आणि ज्या ठिकाणी सेंटर चालवत होतो तेथे मी स्प्राईट येत असताना स्प्राईटची बाटली काढून तिथे चिलीम लावून मला बदनाम केलं आहे, असा दावाही बाबा जगताप यांनी केला. तसेच अंजली दमानिया यांनी मी ई-सिगारेट ओढत असल्याचा आरोप केलाय. आमच्या गावात गायछाप मिळायचे वांदे, ती लवकर मिळत नाही आणि अंजलीताई ई-सिगारेटचं बोलाताय…ई-सिगारेट काय असते, ते आम्हाला अंजली दमानियांनी म्हटल्यावर समजले, असंही बाबा जगताप म्हणाले.
नेमकं प्रकरण काय?
माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार आल्यानुसार करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहचल्या. मुरुम उचलण्याच्या मुद्यावरुन कुर्डू गावातील नागरीक आणि अंजली कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी रंगली. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबा जगताप या कार्यकर्त्याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावून अंजली कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवार आणि त्यांचा आवाज ओळखता आला नाही. तिकडून अजित पवार दोनदा सांगताना दिसले की, डीसीएम अजित पवार बोल रहा हूं. ये कार्यवाही बंद करो…मेरा आदेश हैं.. त्यावर कृष्णा म्हणतात मेरे फौन पर काॅल करें..त्यावर पवार म्हणताहेत..की तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी..मेरा चेहरा तो पेहचानोगा ना..असे रागावून अजित पवार बोलले आणि अजित पवारांनी व्हिडीओ काॅल केला. त्यावर कृष्णा बांधावरच जाऊन बसून पवारांशी बोलताना दिसल्या…यात अजित पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे पहायला मिळत असून…माझा फोन आलाय…तहसीलदारांना सांगा असे अजित पवार सांगताना दिसतात.
कुर्डू गावातील मुरूम उपसा बेकायदेशीरच-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सदर प्रकरणाची दखल घेत घटनेचा अहवाल मागवला होता. जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांना अहवाल देण्याचे आदेश दिल्यावर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांना तीन पानी अहवाल पाठवला आहे. यात कुर्डूतील मुरूम उत्खनन बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला आहे. अहवालात म्हटले आहे की, 31 ऑगस्टला कुर्डूचे ग्राम महसूल अधिकारी गाव हद्दीतील गट क्रं. ५७५/ १ या जमिनीत सुरू असलेल्या मुरूम उपशाची चौकशी व पाहणीसाठी गेले होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी कारवाई दरम्यान प्रतिबंध करत सरकारी कामात अडथळा आणला. तेथील पंचनाम्यात ग्रामपंचायतीने 120 ब्रास अवैध मुरूम उत्खनन केल्याचे आढळले. मुरूम उत्खनन हे कुर्डू -शिराळ पाणंद रस्ता व कुर्डू अंबाड पाणंद रस्त्याच्या कामासाठी मुरूम उपसा केल्याचे सांगितले. या कामासाठी ग्रामपंचायतीला गटविकास अधिकाऱ्यांनी कार्यारंभ आदेश दिल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते. मात्र, गटविकास अधिकाऱ्यांकडे आढावा घेतला असता जा. क्र./प.स.कु/ ४५/२०२४ (दि-१४ / १०/ २०२४) याच्या कामकाजास मुदतवाढ नसल्याचे सांगितले. त्यांनी हे काम 14 ऑक्टोबर 2024 मधील होते. तेव्हापासून सहा महिन्यात काम पूर्ण करण्याचे कार्यारंभ आदेशात नमून होते, ते न केल्यास काम रद्द करण्याचे नमूद होते.
कुर्डू गावातून त्या दिवशी बाबा जगताप यांनी लावला होता अजितदादांना फोन, VIDEO:
https://www.youtube.com/watch?v=fpon_uokkz4
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.