इंस्टाग्रामवर ओळख, लग्नाचं आमिष देत शरीरसंबंध ठेवले, 17 वर्षांची मुलगी गरोदर राहताच…

रायगाद गुन्हा: रायगडच्या उरणमध्ये धक्कादायक घटना घडली आहे . Instagram वरून ओळख एका अल्पवयीन मुलीला महागात पडली आहे .एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने रसायनी येथील सतरा वर्षीय मुलीसोबत Instagram वरून ओळख केली .तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केला .लग्नाचे आम्हीच दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले .मात्र पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर अल्पवयीन मुलाने तिच्यासोबत लग्न करण्यास नकार दिलाचा प्रकार समोर आला आहे .

इंस्टाग्रामवर ओळख, प्रेमसंबंध अन् घात झाला ..

उरण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी व आरोपी मुलगा दोघांनी आपले शिक्षण अर्धवट सोडले असून 2024 च्या जानेवारीमध्ये दोघांची instagram वर ओळख झाली होती .नंतर त्यांच्यात प्रेम संबंध निर्माण झाले . पीडित मुलीच्या आई-वडिलांना काही महिन्यांपूर्वी याबाबतची माहिती समजल्यानंतर त्यांनी अल्पवयीन मुलाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती . त्यावेळी अल्पवयीन मुलाने पीडित मुली सोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली .त्यावेळी पिढी त्याच्या आई-वडिलांनी मुलीचे वय पूर्ण झाल्यानंतर तिचं लग्न मुलासोबत लावून देण्याची तयारी दर्शवली होती .तोपर्यंत पीडित मुलीला अल्पवयीन मुलाच्या घरी ठेवले होते . मात्र .मुलाच्या घरी वास्तव्यास असताना पीडित मुलगी गरोदर राहिली .त्यामुळे अल्पवयीन मुलाने व त्याच्या कुटुंबीयांनी पीडित मुली सोबत लग्न नकार दिला .तिला घरातून बाहेर हाकलून दिले .

पोलिसांनी नोंदवला गुन्हा

मुलगी आई-वडिलांच्या घरी परत आली त्यावेळी तिने घडला प्रकार पालकांना सांगितला .त्यानंतर रसायनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अल्पवयीन मुलाविरोधात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याप्रकरणी तसेच पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास उरण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे . उरण पोलीस या प्रकरणातील अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याची बालसुधारगृहात रवानगी केली आहे .

पती नपुंसक, सासऱ्याची सुनेकडे नातवासाठी सेक्सची मागणी केली

एका धक्कादायक घटनेत निवृत्त सहायक पोलिस आयुक्त, त्यांची पत्नी आणि मुलगा या तिघांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३० वर्षीय विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, मुलगा नपुंसक असल्याचे माहिती असूनही ती गोष्ट लपवून ठेवत विवाह लावण्यात आला. त्यानंतर मूल व्हावे यासाठी सुनेवर अमानवी दबाव टाकण्यात आला. ही घटना ५ मे ते २३ जून दरम्यान घडली आहे. फिर्यादीचा विवाह मे महिन्यात एमबीए शिक्षण घेतलेल्या मुलाशी झाला. मात्र, तो नपुंसक असल्याचे तिला लक्षात आले. त्यानंतर पती व सासू यांनी थेट सासऱ्यासोबत संबंध ठेवण्यास भाग पाडत मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला.

आणखी वाचा

Comments are closed.