मैत्रीणीने मैत्री तोडली अन् त्याच्यासोबत बोलायला लागली; रागाच्या भरात मित्राच्या मदतीनं केला धा
पुणे: पुण्यात येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोड येथे कंपनी कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याचं सीसीटीव्ही समोर आलं आहे. हल्ल्यामध्ये संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून येरवडा येथील खाजगी रुग्णालयांमध्ये त्याचा उपचार सुरू आहेत. या परिसरात अनेक वेळा या घटना घडत आहे. अधिक तपास येरवडा पोलीस करत आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये ज्याच्यावर हल्ला करण्यात आला त्याचे नाव दिप्तिमान देवव्रत दत्ता (वय 33) असे आहे.
शिवलिंग म्हात्रेच्या मैत्रीणीने त्याच्याशी मैत्री तोडून…
तर हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव शिवलिंग म्हात्रे (वय 25) असे आहे. शिवलिंग म्हात्रेच्या मैत्रीणीने त्याच्याशी मैत्री तोडून दिप्तिमान देवव्रत दत्ता याच्यासोबत मैत्री सुरु केल्याने चिडून शिवलिंगने हा हल्ला केला आहे. दिप्तिमान देवव्रत दत्ता मैत्रीणीला घेण्यासाठी थांबलेला असताना शिवलिंगने हा हल्ला केला आहे. शिवलिंगला या हल्यात मदत करणाऱ्या सिद्धार्थ गादिया आणि बालाजी मुंडे यांना अटक केली आहे. मात्र शिवलिंग म्हात्रे फरार झाला आहे.
मैत्रीणीला घेण्यासाठी थांबलेला असताना शिवलिंगने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला
सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या हल्ल्याग्रस्त युवकाचे नाव दिप्तिमान देवव्रत दत्ता (वय ३३) असे आहे. तर हल्ला करणारा आरोपी शिवलिंग म्हात्रे (वय २५) असून, त्याच्या मैत्रीणीने त्याच्याशी नातं तोडून दिप्तिमान दत्ताशी मैत्री सुरू केल्याच्या चीडीतून त्याने हा हल्ला केला. दिप्तिमान आपल्या मैत्रीणीला घेण्यासाठी थांबलेला असताना शिवलिंगने त्याच्यावर अचानक हल्ला चढवला. या प्रकरणात शिवलिंगला साथ देणारे सिद्धार्थ गादिया आणि बालाजी मुंडे यांना पोलिसांनी अटक केली असून, शिवलिंग म्हात्रे अद्याप फरार आहे.
पुण्यात येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोड येथे कंपनी कर्मचाऱ्यावर शस्त्राने प्राणघातक हल्ला केला आहे, सीसीटीव्ही समोर आलं आहे. तरुण गंभीर जखमी झाला असून येरवडा येथील खाजगी रुग्णालयांमध्ये त्याचा उपचार सुरू आहेत . या परिसरात अनेकवेळा या घटना घडत आहेत. #punecrime #क्रिमहेन्यूज #सीसीटीव्ही pic.twitter.com/9iasyzqich
– अंकीता शांतीनाथ खाने (@khaneankita) 12 सप्टेंबर, 2025
आणखी वाचा
Comments are closed.