उद्धव ठाकरे म्हणाले, रक्त अन् क्रिकेट सामने एकत्र कसे? भारत-पाक सामन्यावर अजित पवारांची पहिली प

भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्यावरील अजित पवार: यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक 2025 क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील साखळी फेरीतील सामना (India-Pakistan Asia Cup Match ) उद्या (14 सप्टेंबर) रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरुद्ध सामना खेळू नये, अशी मागणी करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेना ठाकरे गटाकडून उद्या राज्यभरात माझं  ‘माझं कुंकू-माझा देश’ आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. तर आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर भाजपवर जोरदार टीका केली. पंतप्रधान मोदीखून और पाणी एक साथ नही बाहेगा, असं म्हणत होते. त्यांनी आता खून और क्रिक्रेट एक साथ कैसे बहेगा हे मोदींनी सांगावं, असे त्यांनी म्हटले. आता यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार म्हणाले की, देशात 140 कोटी जनता असल्यानंतर वेगवेगळे मतप्रवाह असणार आहेत. अनेकांची मतं वेगळी असतात. यामध्ये दोन्ही वर्ग आहेत. दोन्ही वर्गाचं वेगवेगळे म्हणणं आहे. सामना होणार आहे अशी माझी माहिती आहे. ज्या स्तरावर निर्णय घ्यायचा असतो त्या स्तरावर निर्णय घेतला गेला आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

आमच्या तिघांचं व्यवस्थित सुरू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची  ठिणगी पडल्याची माहिती समोर आली आहे. ड वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्यावरून नव्या वादाला तोंड फुटल्याची चर्चा आहे. याबाबत विचारले असता अजित पवार म्हणाले की, असं काही नाही, मी स्टॅम्पवर लिहून देऊ का? असं काही नाही. आम्ही तिघे एकत्रित बसतो, त्यावेळेस कधीही असं जाणवलं नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेही चांगले काम करतात. राज्यात चांगला कारभार व्हावा, असा आमचा तिघांचा प्रयत्न असतो.  आमच्या तिघांचं व्यवस्थित सुरू आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

मी त्यावर बोलणार नाही

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील संवादाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. यामुळे विरोधकांनी अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. याबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, त्याबद्दल नो कमेंट्स. मी माझी भूमिका मांडली आहे. फेसबुकवर आणि ट्विटर मी स्पष्टीकरण दिलं आहे. मी त्यावर बोलणार नाही. मला जे उत्तर द्यायचं आहे ते मी दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे की, अजित पवारांनी जी भूमिका मांडायची आहे ती मांडली आहे, असे त्यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=m0md6ukm0cq

आणखी वाचा

उधव ताककररी: आता हे स्पष्ट करूया की मार्क त्रुटी त्यासाठी एक समर्थन आहे; इंडिया-पाक सामना आणि समीक्षकांकडून संप

आणखी वाचा

Comments are closed.