वरिष्ठ पोलिसांना मारणे, लोकांच्या सुपाऱ्या देऊन हत्या घडवून आणणे हा यांचा इतिहास : राम सातपुते
Ram Satpute on Dhairyasheel Mohite Patil, Solapur : “कुर्डूच्या माजी सरपंचांनी जे आरोप केले, त्यामध्ये 100 टक्के सत्य आहे. सुपाऱ्या देऊन लोकांना मारणे, लोकांच्या जमिनी बळकावणे. गोरगरीब लोकांवर खोटे गुन्हे दाखल करणे. राजकीय विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल करणे, हा यांचा इतिहास आहे”, असं म्हणत माळशीरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर टीका केली आहे. ते सोलापुरात बोलत होते. काही दिवसांपूर्वी धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुर्डूची अवस्था बीडपेक्षा वाईट असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर कुर्डूच्या माजी सरपंचांनी मोहिते पाटलांवर गंभीर आरोप केले. आता राम सातपुते यांनी कुर्डूच्या माजी सरपंचांच्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं सांगितलं आहे.
वरिष्ठ पोलिसांना मारणारे हे आहेत, राम सातपुतेंचा मोहितेंवर आरोप
राम सातपुते म्हणाले, अकलूजमध्ये खूनांची मालिका झाली. याचा आका कोण आहे? अकलूजचा आका कोण आहे? याची चौकशी झाली पाहिजे. ज्यांनी खून केले, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. याबाबत सीबीआयकडून चौकशी झाली पाहिजे. याबाबतचं पत्र लिहून मी माननिय मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी करणार आहे. ही एक विकृती आहे. ही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे. अशा पद्धतीने लोकांच्या सुपाऱ्या देऊन हत्या घडवून आणणे, हा यांचा इतिहास आहे. दारु पिऊन गाडी चालवली म्हणून पोलिसांनी हटकलं, म्हणून वरिष्ठ पोलिसांना मारणारे हे आहेत. आज यांना पोलिसांचा पुळका आलाय? अशा प्रवृत्तींच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ताकदीने लढणार आहे. अकलूजमधील गुंडांची दहशत मोडून काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटीबद्ध आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिला अधिकाऱ्या अंजना कृष्णा यांना फोनवरुन दम दिला आणि कुर्डू येथील बेकायदा मुरुम उपसावर सुरु असलेली कारवाई थांबवण्यास सांगितले होते. त्यानंतर मोहिते पाटलांनी कुर्डूमध्ये बीडपेक्षा वाईट परिस्थिती आहे, असं म्हटलं होतं.
कुर्डूच्या माजी सरपंचांनी गंभीर आरोप केल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, आरोप करणाऱ्यांना कायदेशीर भाषेत उत्तर मिळेल. दरम्यान आपण केलेले सर्व आरोप कायदेशीर पुराव्यानिशी केलेले असून केवळ सरकारी जमिनीतील बेकायदा मुरूम उपसा झाल्याचे आणि येथील गुंडगिरीचे दाखले दिले होते. बेकायदा मुरूम उपसा व सरकारी अधिकाऱ्यांना धमकावणे मारहाण करणे. सरकारी कामात अडथळा आणणे अशा विविध पुण्यातील आरोपींना अद्याप पोलिसांनी अटक का केली नाही? असा सवाल ही खासदार मोहिते पाटील यांनी केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.