देवाभाऊंच्या कॅम्पेनला ‘देवा तूच सांग’ने प्रत्युत्तर; अजित पवारांच्या गुलाबी रंगाला शरद पवारांच

रोहित पवार: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं (NCP Sharad Pawar) आज नाशिकमध्ये (Nashik) शिबीर होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी (Sharad Pawar) देखील तयारीला सुरूवात केलीये. या शिबिरात पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच आगामी महापालिका निवडणुकांसाठी रणनीती आखली जाणार आहे. या शिबिरात शरद पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.शिबिराच्या माध्यमातून पक्षाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या शिबिराआधी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधत विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

आमदाराला सांगण्यात आलं होतं देवाभाऊ जाहिरात लावा

राज्यातील प्रत्येक तालुक्यातील आमदाराला सांगण्यात आलं होतं देवाभाऊ जाहिरात लावा. मात्र नाव कुठेच छापल नव्हतं. आमची जाहिरात बघा, आम्ही आमच नाव छापलं आहे. त्यांनी नाव छापलेले नाही, याचा अर्थ मेघा इंजिनियरिंग कंपनीने जाहिरात दिली का? कारण 190 रुपये त्यांचे माफ झाले आहेत. कोकणात अजित पवारांच्या पक्षाच्या नेत्याने जाहिरात लावली आहे. भविष्यात ते त्यांच्या सोबत राहणार नाहीत. महिला आणि बालकल्याण खात्याचा संबंध असू शकतो. कारण दादांच्या पक्षाचे कोकणातील नेते यांची भाजप सोबत जास्त जवळीक झाली आहे. दादांचे पोस्टर कमी देवाभाऊचे पोस्टर त्यांनी जास्त लावले, असा टोला रोहित पवारांनी लगावला.

शरद पवार गटाकडून पिवळ्या रंगाचा वापर

शरद पवार गटाकडून नाशिकमध्ये उद्या मोर्चा काढण्यात येणार आहे. याआधी भाजपकडून राज्यभरात राबवण्यात आलेल्या देवाभाऊ कॅम्पेनला ‘देवा तूच सांग’ने शरद पवार गटाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची नाशिक जिल्ह्यात विविध दैनिकात जाहिरात देण्यात आली आहे. यामध्ये शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, कांदा निर्यातबंदी, अतिवृष्टीमुळे झालेल नुकसान, लाडक्या बहीणींना 2100 रुपये, युवाना नोकरी या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार? देवा तूच सांग म्हणत शरद पवार गटाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे शरद पवार गटाने दिलेल्या जाहीरातीमध्ये पिवळ्या रंगाचा वापर करण्यात आला आहे. यावरुन पिवळ्या रंगाने गुलाबी रंगाला उत्तर की ओबीसीला खुणावत आहात?, असा प्रश्न रोहित पवारांना विचारण्यात आला. यावर पिवळा रंग सूर्याचा रंग आहे. आम्ही पुन्हा उजळत आहोत. पुन्हा झेप घेत आहोत म्हणून हा रंग वापरला आहे. गुलाबी रंगाला उत्तर नाही, असं रोहित पवारांनी सांगितले.

सुनील तटकरे यांच्या जवळच्या व्यक्तीच्या एजन्सीला साडे तीन कोटी रुपये

निवडणूक संपल्यानंतर दुसऱ्या खात्यातून लाडक्या बहिणींसाठी पैसे आणण्यात आले आणि सुनील तटकरे यांच्या जवळच्या व्यक्तीच्या एजन्सीला साडे तीन कोटी रुपये देण्यात आले. हे चुकीच आहे याबाबत आम्ही प्रश्न अधिवेशनात उपस्थित करणार आहोत, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.