बुमराहला षटकार मारण्याच्या बाता, ग्राउंडवर येताच पाकिस्तान खेळाडू तोंडावर आटपला, हार्दिक पांड्य

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2025: भारत आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या आशिया कप 2025 च्या हायव्होल्टेज सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीलाच आपले वर्चस्व गाजवले. टॉस पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगा याने जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्यांचा हा निर्णय त्यांच्या संघावर उलटला.

हार्दिकने सॅम अयूबला धाडले माघारी

भारतीय संघाने चांगली सुरुवात करत पाकिस्तानला दोन षटकात दोन मोठे धक्के दिले आहेत. हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात घातक ओपनर सॅम अयूबला (Hardik Pandya Dismissed Saim Ayub) शून्यावर माघारी धाडले. पहिली चेंडू वाईड टाकल्यानंतर हार्दिकने पुढचा चेंडू गुड लेंथवर टाकला. अयूबने कट शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण पॉईंटवर उभ्या असलेल्या जसप्रीत बुमराहच्या हातात सरळ चेंडू गेला. अशा प्रकारे पाकिस्तानला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला.

साल्ग II, गोल्डन डक

सॅम अयूबची खराब फॉर्म सुरूच आहे. ओमानविरुद्धच्या सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर एल्बीडब्ल्यू झाला होता आणि आता भारताविरुद्धही तो गोल्डन डकवर गेला. सामन्याआधी अयूबने भारताविरुद्ध खेळणे काही वेगळं नाही असं विधान केलं होतं, पण मैदानात उतरल्यावर खरी परिस्थिती सर्वांना दिसून आली.

भारताची धडाकेबाज सुरुवात

हार्दिकनंतर जसप्रीत बुमराहने दुसऱ्या षटकात मोहम्मद हारिसला केवळ 3 धावांवर बाद केले. अशा प्रकारे पाकिस्तानला अवघ्या दोन षटकांत दोन मोठे धक्के बसले आणि भारताने सामन्याच्या सुरुवातीपासूनच पकड मजबूत केली.

भारतीय संघाची प्लेइंग-11

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती.

पाकिस्तान संघाची प्लेइंग-11 :

साहिबजादा फरहान, सॅम अयूब, मोहम्मद हरीस (यशरक्षक), फखर झमान, सलमान आगा (कर्नाधर), हसन नवाझ, मोहम्मद नवाज, फहीम अशरफ, शाहीन मुकिम, अब्रार अहमद.

हे ही वाचा –

IND vs PAK Asia Cup 2025 : टॉस जिंकला पण पाकिस्तानच्या कॅप्टननं केली मोठी चूक, सूर्यकुमार यादवला जे हवं होतं तेच केलं, टॉसवेळी काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.