लव्ह ट्रँगल! संसारात रमलेल्या नागनाथचे अपहरण अन् मारहाण, 11 वर्षांनंतर जुन्या प्रेयसीचं कांड
बीड क्राइम न्यूज: बीडमध्ये एका तरुणाचं अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केल्याचं प्रकरण समोर आलं. महत्त्वाची बाब म्हणजे या अपहरणामागे तरुणाच्या जुन्या प्रेयसीचाच हात होता. सुपारी देऊन तिनं तरुणाचं अपहरण केलं. मात्र पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि तरुणाची 14 तासात सुटका केली. तब्बल 11 वर्षे आपल्या संसारात रमलेल्या जुन्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी त्याच्या जुन्या प्रेयसीने हे कृत्य केल्याने एकाच वेळी आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे.
आधी मारहाण, मग अपहरण आणि सुटकेचा थरार अशी काहीशी ही घटना घडली बीड जिल्ह्यात. दहा ते बारा जणांच्या टोळक्याचा मार खाणाऱ्या तरुणाचे नाव आहे नागनाथ नन्नवरे. या मारहाणीनंतर त्याचं अपहरण झालं. ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनीही तपासाची चक्रं फिरवली आणि 14 तासांत अपहरण झालेल्या नागनाथची सुटका झाली.
नागनाथचं अपहरण कुणी आणि का केलं या प्रश्नाची उकल पोलिस तपासातून समोर आली. या अपहणाचं कारण लव्ह ट्रँगल असल्याचं समोर आलं. नागनाथच्या एक्स गर्लफ्रेन्डनेच त्याचं अपहरण केल्याचं समोर आलं.
नागनाथ-दियाचं नातं संपलं
ज्योती काळेशी नागनाथचे प्रेमसंबंध होते. नंतर काही कारणास्तव दोघे वेगळे झाले. मात्र कालांतराने दिया आणि नागनाथचं प्रेमाचं नातं फुललं. 2011 मध्ये दियाचे पहिले लग्न संतोष पवार याच्यासोबत झाले होते. मात्र त्याला दारूचे व्यसन होते. काही काळाने दिया आणि नागनाथ नन्नवरे यांचे प्रेम संबंध जुळले. अकरा वर्षापूर्वी ते दोघे पळून बीडमध्ये आले. तेव्हापासून दोघे सोबत वास्तव्यास आहेत. अकरा वर्षांपासून दिया आणि नागनाथ एकत्र राहतात.
मागचं सगळं विसरुन दोघांनी एकत्र संसार थाटला. पण ज्योतीच्या मनात अजूनही नागनाथ होता. यातूनच ज्योतीने नागनाथचं अपहरण केलं. ज्या तरुणांच्या माध्यमातून हे अपहरण करण्यात आलं होतं त्यांनी नागनाथला बेदम मारहाण केली.
पोलिसांच्या सतर्कतेमुळे 14 तासात सुटका
प्रेमाच्या त्रिकोणातून घडलेल्या अपहरणाला एखाद्या सिनेमाच्या स्टोरी सारखं वळण आलं. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे 14 तासांत या अपहरणाचा क्लायमॅक्सही पहायला मिळाला. बॉयफ्रेन्डचा काटा काढायला निघालेल्या गर्लफ्रेन्डने स्वत:च्याच पायावर दगड मारुन घेतलाय असंच म्हणावं लागेल.
https://www.youtube.com/watch?v=-mdfhhh64n3i
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.