कन्फर्म? आता ‘या’ अभिनेत्रीला डेट करतोय हार्दिक पांड्या;सेल्फी व्हायरल होताच सोशल मीडियावर उधाण

हार्दिक पांड्या डेटिंग माहेका शर्मा: भारताचा स्टार क्रिकेटपटू हार्दिक पंड्याचं (Hardik Pandya) वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. घटस्फोटीत पत्नी नताशा स्टेनकोविकपासून (Divorced With Wife Natasha Stankovic) वेगळं झाल्यापासूनच क्रिकेटपटूचं नाव (Hardik Pandya New Girlfriend) वेगवेगळ्या अभिनेत्री, मॉडल्ससोबत जोडलं जात होतं. पण, आता हार्दिकच्या हृदयात जागा मिळवण्यात यशस्वी झालेल्या सौंदर्यवतीचं नाव सर्वांना कळलं आहे. यासाठी कारणीभूत ठरलाय एक सेल्फी. यापूर्वी हार्दिक पांड्याचं नाव ब्रिटिश गायिका जास्मिन वालियासोबती जोडलं गेलेलं. पण, आता सध्या हार्दिक पांड्या अभिनेत्री महिका शर्माला (Actress Mahika Sharma) डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

रेडिटवरील एका थ्रेडमध्ये महिकाच्या सेल्फीमध्ये मागे एक व्यक्ती दिसली. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कुणीच नसून हार्दिक पांड्या होता. तेव्हापासूनच हार्दिक आणि महिका यांच्या अफेअरच्या चर्चांनी जोर धरला. सोशल मीडियावर अनेकजण असा प्रश्न विचारत होते की, तो हार्दिकच आहे का? दुसऱ्या एका युजरनं, महिकाच्या एका पोस्टमध्ये हार्दिकचा जर्सी नंबर 33 पाहिला, तेव्हापासून दोघांच्या अफेअरच्या चर्चांनी आणखी जोर धरला.

हार्दिक आणि माहिका दोघेही इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करतात, हे लक्षात आल्यानंतर अफेअरच्या चर्चांनी आणखी जोर धरला. सोशल मीडिया युजर्सनी आणखी एका गोष्टीकडे लक्ष वेधलं. ते म्हणजे, हार्दिक आणि माहिका वेगवेगळ्या फोटोंमध्ये एकाच बाथरोबमध्ये दिसले. यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. माहिकाची लेटेस्ट सोशल मीडिया स्टोरी, ज्यामध्ये ती दुबईला प्रवास करत असल्याचं दिसून आलं, जिथे हार्दिक आशिया कपसाठी टीम इंडियासोबत आहे, त्यामुळे चर्चांनी आणखीच जोर धरला.

हार्दिक पांड्या नवीन मैत्रीण
द्वाराu/offire_influence_1229 मध्येइंडिया क्रिकेटगोसिप्स

सोशल मीडियावर युजर्सच्या रिअॅक्शन्स…

एका सोशल मीडिया युजरनं लिहिलंय की, “मी तिला फॉलो करतो आणि ते नेहमीच क्रिकेट संदर्भातील अपडेट्स शेअर करतात. मी हे पाहून हैराण आहे की, तिनं हार्दिकच्या अनेक पोस्ट लाईक केल्या आहेत. पण, याचा अर्थ असा नाही की, ते दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. असंही असू शकतं की, त्यांची फक्त ओळख असेल…” आणखी एका युजरनं पुढे म्हटलंय की, “माझं घर हार्दिकच्या कॉलनीतच आहे आणि मी कन्फर्म करू शकतो की, मी त्या दोघांना एकत्र पाहिलंय…”

या वर्षाच्या सुरुवातीला हार्दिक ब्रिटिश गायिका जास्मिन वालियाला डेट करत असल्याची अफवा पसरली होती. हार्दिक खेळत असताना जास्मिन वालिया स्टेडियममध्ये दिसली होती. एकदा मुंबईत कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या आयपीएल सामन्यानंतर ते मुंबई इंडियन्स (MI) संघाच्या बसमध्ये एकत्र चढताना दिसलेले. त्यावेळी त्यांनी ना त्यांच्या नात्याबाबत काही सांगितलं किंवा ना चर्चांचं खंडन केलं. नंतर, अशाही चर्चा सुरू झालेल्या की, ते आता वेगळे झाले आहेत आणि त्यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलं आहे.

हार्दिक, नताशाचा घटस्फोट

कोविड-19 महामारी दरम्यान 2020 मध्ये लग्न झालेल्या हार्दिक आणि नताशानं गेल्या वर्षी जुलैमध्ये एकमेकांपासून विभक्त होण्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अनेक महिने दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलेलं, त्यानंतर एकदा हार्दिक पांड्यानं बोलताना सांगितलेलं की, “चार वर्ष एकत्र राहिल्यानंतर, नताशा आणि मी परस्पर सहमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत आणि आमचं सर्वस्व दिलं आहे आणि आम्हाला वाटतं की, हे आमच्या दोघांच्याही हिताचं आहे. कुटुंब म्हणून एकत्र असताना आम्ही आनंद, परस्पर आदर आणि एकत्रता लक्षात घेता हा एक कठीण निर्णय होता.”

आणखी वाचा

Comments are closed.