एन्काऊंटरची धमकी ते अमानुष मारहाणीनंतर कागदावर सही; आंघोळ अन् ब्रश… आंदेकर गँगचे कोर्टात धक्क
पुणे : पुण्यातीन नाना पेठेत गणेश विसर्जनाच्या पुर्वसंध्येला झालेल्या आयुष कोमकर (Ayush Komkar Case) हत्या प्रकरणात काल (सोमवारी,ता15) सुनावणी पार पडली. या सुनावणीवेळी कोमकर हत्या प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या आंदेकर कुटूंबियांनी (Bandu Andekar) पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. माझ्या मुलाला कृष्णा आंदेकरला पोलिस ठाण्यात हजर राहायला सांगितलं नाही तर त्याचा एन्काऊंटर करू, अशी धमकी पोलिसांनी दिली असल्याचं सूर्यकांत उर्फ बंडू अण्णा आंदेकर याने न्यायाधीशांसमोर सांगितलं आहे. तर हत्या प्रकरणातील आरोपी असलेले अमन पठण, सुजल मिरगु, वृंदावणी वाडेकर आणि तिच्या पोराने देखील पोलिसांवर गंभीर आरोप करत त्यांच्या तक्रारीचा पाढा वाचला आहे.
“गेल्या चार-पाच दिवसांपासून आम्हाला अंघोळ करू दिली नाही, ब्रश करण्यासही मज्जाव केला. शिवाय आम्हाला बेदम मारहाण करून जबरदस्तीने कागदावर सही करायला लावली. त्या कागदात नेमकं काय लिहिलं आहे, हेही आम्हाला दाखवलं नाही,” असा गंभीर आरोप आरोपींनी न्यायालयात केला. त्यानंतर न्यायालयाने पोलिसांना स्पष्ट निर्देश देत आरोपींना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी ताकीद दिली.
सरकारी वकीलांनी काय म्हटलं?
या प्रकरणात आरोपींना अटक केली आहे. शस्त्र कुठून आणले, ते कोणी पुरवले आहेत, या हत्येसाठी सर्व आर्थिक मदत कुणी केली याचा तपास करायचा आहे. यासाठी पोलीस कोठडीची गरज आहे, असं सरकारी वकील म्हणाले. त्यावर आरोपींच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.
आरोपींच्या वकिलांचा युक्तीवाद काय?
“सुजल आणि अमन यांचा तपास झाला आहे. रिकवरी, डिस्कवरी झाली आहे. त्यामुळे आणखी पोलीस कोठडीची गरज नाही”, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला आहे. पकडलेल्या इतर आरोपींच्या वकीलांनी म्हटलं की, “फक्त चुलत भावाची फॅमिली असल्यामुळे त्यांना अडकवलं जात आहे. लक्ष्मी आंदेकर यांच्यावरती एकही गुन्हा दाखल नाही. त्यांचं वय देखील जास्त आहे, त्यांना काही आजार आहेत, त्याचा कोर्टाने विचार करावा, त्याचबरोबर तांत्रिक तपासासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. भारती विद्यापीठच्या गुन्ह्यात यांचा काही संबंध नाही. मग या गुन्ह्यात कसा असेल? शिवम, वनराजच्या, केसमध्ये प्रत्यक्षदर्शी असल्याने त्याच यात नाव घातलं आहे”, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी कोर्टात केला.
सूर्योदयानंतर अटक केली – वृंदावनी वाडेकर
“आम्हाला आमच्या सुना आणि नातवंड सोबत असताना अटक करण्यात आली, पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं, सूर्योदयानंतर अटक केली”, असं वृदावनी वाडेकर कोर्टात म्हणाली.
बंडू आंदेकर म्हणाला…
“तपास अधिकारी, पोलीस अधिकारी शैलेश संखे हे कृष्णाला हजर व्हायला सांग नाहीतर गोळ्या घालतो अशी धमकी देतात”, असं बंडू आंदेकरने म्हटलं आहे. तर
सुजल आणि अमन काय म्हणाले?
आरोपी सुजल आणि अमन यांनी देखील आपली बाजू मांडत म्हटलं की, ” 4-5 दिवस पोलिसांनी अंघोळ, ब्रश करू दिली नाही, असा आरोप केला आहे.आम्हाला खूप मारहाण केली आणि कागदावर/जबाबावर सह्या घेतल्या, काय लिहिलं होत हे वाचू दिलं नाही”, असा आरोप त्यांनी केला. दरम्यान, मकोका न्यायालयाने सर्व आरोपींना तीन दिवसांची 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.