आईने ‘TV पाहण्यापेक्षा अभ्यास कर’ म्हणताच राग अनावर, नर्सिंगच्या विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
छत्रपती संभाजिनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी भागात धक्कादायक प्रकार घडला आहे. आईने अभ्यास करण्यासाठी रागावल्यानंतर अवघ्या 18 वर्षांच्या नर्सिंग विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Sucide News)
“टीव्ही पाहण्यापेक्षा अभ्यास कर” एवढं आईने म्हणताच 18 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीने रागाच्या भरात राहत्या घराचा तिसरा मजला गाठला आणि गळफास घेऊन जीवन संपवलं.
नेमकी घटना काय?
मृत विद्यार्थिनीचं नाव विशाखा अनिल वक्ते (वय 18, मूळ रा. वडवणी, सध्या मुक्काम वडगाव कोल्हाटी, संभाजीनगर) असं आहे. विशाखा ही नुकतीच नर्सिंगच्या अभ्यासक्रमात दाखल झाली होती आणि सध्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होती. 14 सप्टेंबर रोजी संध्याकाळी ती घरात टीव्ही पाहत होती. यावेळी तिच्या आईने तिला अभ्यासाकडे लक्ष दे असं सांगितलं. आईच्या या बोलण्याचा राग अनावर झालेल्या विशाखाने घरातील तिसरा मजला गाठला. काही क्षणांतच तिने जिन्याजवळील छताला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला.
आई स्वयंपाकघरात, तर लहान भाऊ दुसऱ्या खोलीत अभ्यास करत असल्याने विशाखाने गळफास घेतल्याचं कुणालाच कळलं नाही. काही वेळाने कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर आरडाओरड झाली. तातडीने तिला खाली उतरवून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासून विशाखाला मृत घोषित केलं.
कुटुंबाचा आक्रोश
या घटनेनंतर रुग्णालयात कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. विशेषत: आईचा आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले. “इतक्या किरकोळ कारणावरून मुलगी असं टोकाचं पाऊल उचलेल, असा विचारही केला नव्हता,” असं नातेवाईकांनी सांगितलं. या प्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली असून, पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पतीचं आजारपण असह्य, पत्नीची रुग्णालयातील खोलीतच आत्महत्या
पतीच्या आजारपणाला आणि घरातील वाढत्या आर्थिक विवंचनेला कंटाळून एका महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. पती दाखल असलेल्या खाजगी रुग्णालयातच पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयुरी पंधरे (वय 28) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, पतीचं दीर्घ आजारपण, वारंवार होणारा खर्च, घरची जबाबदारी आणि वाढत चाललेले कर्ज या सर्व गोष्टींनी मयुरी मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या. त्यामुळेच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
आणखी वाचा
Comments are closed.