मीनाताईंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला; राज ठाकरे घटनास्थळी पोहचले, उद्धव ठाकरेही येणार, नेमकं का
मीनाटाई पुतळ्यावर राज आणि उदव ठाकरे मुंबई: स्वर्गीय मीनाताई ठाकरे (Meenatai Thackeray) यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाला. दादरच्या शिवाजी पार्कवरील पुतळ्याजवळ ही घटना घडली आहे. काल (16 सप्टेंबर) रात्री कोणीतरी हा लाल रंग टाकल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हा लाल रंग नेमका कोणी टाकला याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी मीनाताई ठाकरे यांचं 1995 साली निधन झालं होतं. त्यानंतर शिवाजी पार्क परिसरात त्यांचा अर्धकृती पुतळा उभारण्यात आला होता. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटासह शिवसेना शिंदे गटाने देखील आक्रमक पवित्रा घेतला आहे. सदर घटनेनंतर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याजवळ दाखल झाले आहेत.
राज ठाकरे यांनी मीनाताई ठाकरेंचा पुतळा असलेल्या परिसरात जी घटना घडली आहे, त्याची संपूर्ण माहिती घेतली आहे. या परिसरात नेमके काय काय घडले आणि आतापर्यंत पोलिसांकडून काय कारवाई करण्यात आलीय, याची संपूर्ण माहिती राज ठाकरेंनी घेतली. राज ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक मनसे सचिव सचिन मोर यांनी घटनास्थळी येऊन आढावा घेतला. त्यानंतर सर्व घटनाक्रम राज ठाकरे यांना सांगण्यात आला. यानंतर राज ठाकरे मीनाताईंच्या पुतळ्याजवळ दाखल झाले आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शाखाप्रमुखांच्या बैठकीआधी मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याच्या ठिकाणी येणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आधीच आपल्या नेत्यांकडून मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या ठिकाणी काय झालं, याची माहिती घेतली आहे.
नेमकं काय घडलं?
कोणीतरी सकाळच्या सुमारास मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या जवळ लाल रंग टाकण्याचा प्रयत्न केला आहे घटनास्थळी शिवसैनिक जमले आहेत. काही शिवसैनिक पुतळ्याच्या आजूबाजूची साफसफाई करताना दिसून येत आहेत. या घटनेची माहिती मिळताच तातडीने या ठिकाणच्या स्थानिक आमदार, खासदार, काही शिवसैनिक परिसरात दाखल झाले. जमलेल्या शिवसैनिकांनी साफसफाई सुरू केले. पोलिसांच्या माहितीनुसार ही घटना सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडली आहे. सकाळी त्या आधी असं काहीच नव्हतं. आजूबाजूचा लाल रंग शिवसैनिकांनी पुसून काढला आहे. शिवसैनिकाने आजूबाजूचा लाल रंग पुसत साफसफाई केली.
स्थानिक आमदार महेश सावंत काय म्हणाले?
स्थानिक आमदार महेश सावंत यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितलं की, आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. त्यानंतर स्थानिक शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले. त्याच वेळी पोलिसही दाखल झाले होते. पोलिसांच्या माहितीनुसार सकाळी 6.10 वाजेपर्यंत सर्व काही व्यवस्थित असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले आहे. याचा अर्थ ही घटना सकाळी 6.10 वाजल्यानंतर झाली असावी अशी माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी दुपारपर्यंत आरोपीची माहिती समोर येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
https://www.youtube.com/watch?v=480mgny-he4
संबंधित बातमी:
मोठी बातमी : मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला, ठाकरेंची सेना आक्रमक, पोलिसात तक्रार
आणखी वाचा
Comments are closed.