आधीच भिकारी, त्यात आशिया चषकातून बाहेर पडण्याचा निर्णय, मॅच न खेळल्यास पाकिस्तानला किती दंड?

मुंबई : भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर हस्तांदोलन केलं नसल्याने तिळपापड झालेल्या पाकिस्तान टीमने आशिया चषकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने तक्रार केलेल्या अंपायरविरोधात आयसीसीने कोणतीही कारवाई केली नसल्याने पाकिस्तान नाराज झाला असून त्याने आशिया चषक न खेळण्याचा निर्णय घेतला. पण पाकिस्तान क्रिकेट टीमचा हा निर्णय त्यांच्या बोर्डाला मात्र आर्थिकृष्ट्या खड्ड्यात घालणारा ठरू शकतो अशी शक्यता आहे. आधीच आर्थिक संकटात असलेल्या पीसीबी त्यामुळे अधिकच संकटात येऊ शकते.

मागणी मान्य न झाल्याने निर्णय

भारत-पाकिस्तानच्या सामन्यानंतर विजय मिळवल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केलं नाही. ही जबाबदारी सामन्याच्या अंपायरची होती असं सांगत पाकिस्तान क्रिकेट बोर्डने संबंधित अंपायरवर कारवाई करा अशी मागणी केली होती. या संबंधी पाकिस्तानने आयसीसीला दोन पत्रंही लिहिली होती. परंतु आयसीसीने कोणतीही कारवाई केली नाही.

आयसीसीच्या भूमिकेविरोधात पाकिस्तानने मोठा निर्णय घेत आशिया चषकातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. बुधवारी रात्री 8 वाजता यूएई विरुद्ध पाकिस्तान असा सामना होता. परंतु हा सामना न खेळण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला. पाकिस्तानच्या खेळाडूंनी हॉटेलमध्येच राहावं असा निरोप पीसीबीकडून आल्याची माहिती आहे.

आयसीसीकडून कारवाई होणार

पाकिस्तानने जर सामना खेळला नाही तर आयसीसी नियमानुसार त्यांच्यावर कारवाई करेल. तसेच पाकिस्तानच्या टीमवर आयसीसीकडून बंदीची कारवाई केली जाऊ शकते. पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष हे आशियाई क्रिकेट बोर्डचे अध्यक्षही आहेत. ते आता या सबंधी भूमिका जाहीर करणार आहेत.

पाकिस्तानला मोठा आर्थिक भुर्दंड

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी स्टेडियम बनवण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डचा मोठा खर्च झाला. त्यानंतर पाकिस्तान बोर्ड आर्थिक अडचणीत सापडलं. आता जर पाकिस्तानने आशिया कपवर बहिष्कार टाकला तर त्यांच्या बोर्डला आणि टीमला जे पैसे मिळणार होते ते मिळणार नाही.

आशिया कप सामन्यांचे काय होणार?

पाकिस्तानने आशिया चषकातून माघार घेतल्याने युएईला 2 गुण मिळतील, त्याचे एकूण 4 गुण होतील आणि ते ग्रुप ए च्या पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतील. पाकिस्तान ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडेल आणि युएई सुपर-4 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ असेल.

https://www.youtube.com/watch?v=n_nqvgrtvbg

आणखी वाचा

Comments are closed.