घायवळ गॅंगने कोथरूडमध्ये तीन राऊंड केले फायर, प्रकाश धुमाळच्या मांडीत अन् मानेत लागली गोळी, जीव

पुणे : पुण्यातील गुंडाचा आता सर्वसामान्यांना देखील त्रास होत असल्याची घटना कोथरूड परिसरामध्ये घडली आहे. गाडीला साईड न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून पुण्यातील कोथरूड भागात मध्यरात्री (Pune Crime News) गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. कुख्यात गुंड निलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी केलेल्या या गोळीबारात ३६ वर्षीय प्रकाश धुमाळ हा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर कोथरूडमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.(Pune Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश धुमाळ हा कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा नसून तो रात्री मित्रांसोबत उभा असताना, दुचाकीला साईड न दिल्यामुळे वाद झाला. त्यानंतर टोळीतील मयुर कुंभारे, मुसा शेख, रोहीत आखाड आणि गणेश राऊत यांनी गोळीबार केला. यापैकी मयुर कुंभारेने थेट गोळीबार केला असून त्याने तीन गोळ्या झाडल्या. यात धुमाळच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे.
या प्रकरणी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत मयुर कुंभारे आणि आनंद चांडलेकर या आरोपींना अटक केली आहे. तर इतर आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पुण्यातील गुन्हेगारी टोळ्यांच्या बेफिकीर कारवायांबद्दल भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मानेला आणि मांडीला गोळी लागली, तशाच अवस्थेत….

गाडीला साईड दिली नाही म्हणून क्षुल्लक कारणावरून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. निलेश घायवळ टोळीकडून करण्यात आलेल्या गोळीबारात प्रकाश धुमाळ हा व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. गोळ्या लागल्यानंतर तो तशाच अवस्थेत आपला जीव वाचवण्यासाठी पळत होता. त्या ठिकाणी रक्ताचे आणि पायाचे ठसे दिसून येत आहेत. कोथरुडमधील सह्याद्री रुग्णालयात जखमीवर उपचार सुरु आहेत‌. घायवळ टोळीतील मुसा शेख, रोहीत आखाड, गणेश राऊत आणि मयुर कुंभारे यांनी गोळीबार केल्याची माहिती आहे. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडलीय आहे. मयुर कुंभारे आणि आनंद चांडलेकर या आरोपींना अटक केल्याची माहिती आहे. इतर आरोपी फरार आहेत. मयुर कुंभारेने हा गोळीबार केला आहे. प्रकाश दुरगुडे असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपींपैकी मयुर कुंभारेने तीन गोळ्या झाडल्यात. यामध्ये प्रकाश धुमाळ यांच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला, परिसरात त्यांचं रक्त पडल्याचं दिसून आलं.प्रकाश धुमाळ यांची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो रात्री मित्रांसोबत उभा होता तेव्हा दुचाकीला रस्ता दिला नाही या क्षुल्लक कारणावरुन ही घटना घडल्याचं समोर आलं आहे.

मला तू रस्ता का देत नाही या कारणास्तव गोळीबार

मिळालेल्या माहितीनुसार, कोथरूडमधील मुठेश्वर मित्र मंडळासमोर प्रकाश धुमाळ आपल्या मित्रांसोबत बोलत उभे होते, या ठिकाणाहून दुचाकीवरून काहीजण आले. त्यांनी मला तू रस्ता का देत नाही या कारणास्तव गोळीबार केला. प्रकाश धुमाळ पळून जाताना त्यांच्या अंगावरून रक्त वाहत होतं. या घटनेबाबत स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही सकाळी पाहिलं तेव्हा इथे खाली रक्त सांडलं होतं, जो कोणी व्यक्ती होता त्याला खूप लागलं होतं. तो इकडून पळून गेला होता. रात्री आमच्याकडे टीव्ही चालू असल्यामुळे आवाज आला नाही. त्यामुळे बाकी काही माहिती नाही.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे तो आपल्या मित्रांसोबत बोलत उभा होता रस्ता दिला नाही. इतक्या शुल्लक करण्यासाठी हा गोळीबार करण्यात आलेला आहे. त्यामुळे पुणे शहरात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

https://www.youtube.com/watch?v=xmd7v2xmnvo

आणखी वाचा

Comments are closed.