घायवळ गॅंगने प्रकाश धुमाळांना गोळ्या घातल्या तिथून पोलिस स्टेशन हाकेच्या अंतरावर? मग पोलिसांना

पुणे: पुण्यात टोळीयुध्दानंतर आता सामान्यांनाही त्रास द्यायला सुरूवात केली आहे. कोथरूड परिसरातील (Pune Kothrud) निलेश घायवळ टोळीतील (Nilesh Ghywal Gang) सदस्यांनी कोथरूड भागामध्ये एका सर्वसामान्य व्यक्तीवर गोळीबार केल्याची घटना घडली आहे. प्रकाश धुमाळ असं गोळीबार झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. धुमाळ यांच्या मानेला आणि मांडीला गोळी लागली आहे. त्यांच्यावरती सह्याद्री रूग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. गाडीला जाण्यासाठी वाट दिली नाही म्हणून हा गोळीबार (Firing) केल्याची माहिती आहे. जीव वाचवण्यासाठी प्रकाश धुमाळ हे जवळच असलेल्या इमारतीच्या दिशेने धावले. सचिन गोपाळघरे नावाच्या स्थानिक व्यक्तीने त्यांची मदत केली. घायवळ टोळीच्या मयुर कुंभारे याने गोळीबार केला आहे. या परिसरातच कोथरूड पोलिस स्टेशन आहे. अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पोलिस स्टेशनमधून पोलिसांना घटनास्थळी पोहोचायला अर्धा तास लागला असंही प्रकाश धुमाळ यांना मदत करणाऱ्या सचिन गोपाळघरे यांनी सांगितलं. (Pune Crime News)

पोलिस स्टेशनपासून घटनास्थळी चालत गेलो तर दोन मिनीटांचा हा रस्ता

स्थानिक नागरिक सचिन गोपाळघरे यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितलं की, रात्री आम्ही झोपायला चाललो होतो. तेव्हा मी त्याला पाहिलं. आवाज झाल्यानंतर पाहिलं तेव्हा ते चौघेजण या ठिकाणी बसले होते. त्यांना विचारलं काय झालं? तेव्हा ते म्हणाले तुम्ही खाली जाऊ नका. मी त्यांना म्हटलं काय झालं. ते म्हणाले खाली फायरिंग झालं. कोणाला लागलं आहे असं मी विचारलं. त्यावर ते म्हणाले एकाला मानेला गोळी लागली आहे. ही सर्व घटना घडली त्यानंतर गोळी लागल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी ते शेजारील इमारतीवर जवळपास अर्धा ता बसून राहिले, तोपर्यंत पोलिस आलेले नव्हते, या घटनेच्या परिसरातून पोलिस स्टेशन अगदी 200 मीटर अंतरावर आहे. चालत गेलो तर दोन मिनीटांचा हा रस्ता आहे. पोलिस स्टेशनच्या बाजुलाच ही घटना घडणं म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहेत. ही घटना घडली तेव्हा पोलिस कुठे होते? दोन मिनीटांच्या अंतरासाठी त्यांनी पोहोचायला अर्धा तास लागला का? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.

पोलिस स्टेशनपासून २०० मीटर अंतरावर

या घटनेत तीन गोळ्या प्रकाश धुमाळ यांना लागल्या. जीव वाचवण्यासाठी ही व्यक्ती एका इमारतीच्या दिशेने धावली आणि एका पाण्याच्या टाकीवर चढून लपुन बसली. या दरम्यान या ठिकाणी राहणाऱ्या सचिन गोपाळघरे नावाच्या व्यक्तीने प्रकाश धुमाळ यांना पाणी दिले, आणि मदत केली. या दरम्यान प्रकाश धुमाळ यांच्या शरिरातून वाहणारं रक्त या इमारतीच्या भोवताली पडलेलं होतं, पायाचे ठसे उमटलेले होते. या घटनेनंतर अर्ध्या तासांनी पोलीस घटनास्थळी आले असं गोपाळघरे यांच म्हणणं आहे. विशेष म्हणजे जिथे ही घटना घडली ते ठिकाण पोलिस स्टेशनपासून २०० मीटर अंतरावर आहे. त्याचबरोबर टोळीशी किंवा कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या व्यक्तीवर गोळीबार होत असेल तर पुण्यात पोलिसांची जरब उरली आहे का? आणि सातत्याने या टोळ्या वारंवार करत असलेल्या या कृत्यांना एकदाच आळा बसेल असं काहीतरी पोलिस करतील का? जेणेकरून त्यांच्या या कारवाया कायमच्या थांबतील असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित होत आहे.

https://www.youtube.com/watch?v=djl_iszqer0

आणखी वाचा

Comments are closed.