आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही, निवडणुका स्वतंत्र लढण्याची आमचीही तयारी : भरग गोगावले

भारत गोगवळे: संजय राऊत (Sanjay Raut)  काही गोष्टी उगाच अंगावर ओढून घेतात. त्यांच्याकडून चुकीचे विधान आल्यामुळे आमच्या मावळ्याकडून उद्गार येतात. त्यामुळं संजय राऊत यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे असे मत मंत्री भरत गोगावले( Bharat Gogavale) यांनी व्यक्त केले. निवडणुका स्वतंत्र लढण्याची आमची देखील तयारी असल्याच गोगावले म्हणाले. आम्ही देखील मेलेल्या आईचे दूध प्यायलेलो नाही, पण महायुती म्हणून लढावं ही आमची भूमिका असल्याचे गोगावले म्हणाले. ते चिपळूनमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

नवरात्रीनंतर पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटेल, मी देवीचा खरचं भक्त असेल तर मला पालकमंत्री पद मिळेल

नवरात्रीनंतर पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटेल. मी देवीला साकडे घालणार असल्याचे गोगावले म्हणाले. मी खरंच देवीचा भक्त असेल तर मला पालकमंत्री पद मिळेल असे भरत गोगावले म्हणाले. पालकांमंत्री पदासाठी माझा हट्ट नाही पण काही गोष्टीमुळं मी त्यासाठी आग्रही आहे. जो हक्क आहे तो का सोडावा? असेही भरत गोगावले म्हणाले.

महायुती सरकार स्थापन होऊन आठ महिने झाले, तरीही रायगड जिल्ह्याचा पालकमंत्री जाहीर झालेला नाही. शिवसेना शिंदे घट आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरू आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री याबाबत निर्णय घेतील, असे बोलून वेळ मारुन नेली जात आहे. शिंदेसेनेकडून भरत गोगावले यांनाच पालकमंत्री पद मिळेल, असा ठाम विश्वास नेते बोलून दाखवत आहेत. पालकमंत्रिपद जाहीर झालेले नसले तरी दोन्ही पक्षांकडून आपल्याला पालकमंत्रीपद मिळावं अशी मागणी होतेय. पालकमंत्री पद भरत गोगावले यांनाच नियुक्त करा, अशी भूमिका शिवसेना शिंदे गटाकडून मांडली जात आहे.

खासदार संजय राऊत विरोधात मालाड मध्ये शिवसेना शिंदे गट आक्रमक

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत विरोधात मालाडमध्ये शिवसेना शिंदे गट आक्रमक झाला आहे. खासदार संजय राऊत कडून सातत्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. याच टीकेच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाकडून खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आलं आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर मालाड शांताराम तलाव समोर संजय राऊत यांच्या प्रतिमेला हा जोडो मारो आंदोलन करण्यात आले आहे. मालाड विधानसभा विभाग अध्यक्ष वैभव भराडकर आणि प्रवक्त्या शितल म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली मोठा संख्या मध्ये शिवसैनिक एकत्र जमून संजय राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या:

एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानंतर भरत गोगावलेंची भाषा बदलली, पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला तर ठिक, नाहीतर…नेमकं काय म्हणाले गोगावले?

आणखी वाचा

Comments are closed.