आईवडील कामावर गेल्यावर काकाने अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य केलं, चेहऱ्यावर जड वस्तूने घाव अन्
नवीन पॅनवेल: घरगुती वादातून अल्पवयीन मुलीची हत्या (Mumbai Crime News) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तळोजामध्ये १७ वर्षीय तरुणीची हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. १९ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाचच्या दरम्यान कामाला गेल्यानंतर १७ वर्षीय मुलीच्या व्यक्तीने डोक्यात, चेहऱ्यावर, डोळ्यावर आणि डोळ्याच्या आजूबाजूला वजनदार वस्तूने मारहाण करून तिच्या गळ्यावर धारदार शस्त्राने (Mumbai Crime News) गंभीर दुखापत केली. यात ती जखमी होऊन तिचा मृत्यू (Mumbai Crime News) झाला. तळोजा पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक त्या ठिकाणी रवाना झाले. आरोपीविरोधात १९ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबईतील तळोजामध्ये घरगुती वादातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीची घरात घुसून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या काकाला अटक केली आहे. (Mumbai Crime News)
Mumbai Crime News: डोक्यावर, चेहऱ्यावर जड वस्तूने तसेच मानेवर धारदार शस्त्राने वार
मिळालेल्या माहितीनुसार, तळोजा फेज २ मधील आसावरी सोसायटीमध्ये १७ वर्षीय मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती.आई-वडील कामावरून घराकडे परतल्यानंतर मुलगी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. तिच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जड वस्तूने तसेच मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले असता तिला मृत घोषित करण्यात आले. तळोजा पोलिसांनी तपास केला असता गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी उल्हासनगर येथून ४५ वर्षीय आरोपीला अटक केली. आरोपी हा मृत मुलीच्या मावशीचा पती असल्याचे समोर आले आहे.
Crime News: कविता म्हणाला नाही; उल्हासनगरमध्ये ४ वर्षीय मुलास मारहाण
प्लेग्रुपमधील चार वर्षाच्या चिमुरड्याला १७ ऑगस्ट रोजी शिक्षिकेकडून मारहाण झाल्याची घटना उघड झाली. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर कॅम्प नं-४, कुर्ला कॅम्प गुरुनानक शाळेजवळील एक्सलेंट प्लेग्रुपमध्ये चार वर्षाचा मुलगा शिकायला जात होता. तो आजारी पडल्याने, पालकांनी शिक्षिकेकडे विचारणा केली. मात्र, तिच्याकडून योग्य कारण देण्यात आले नाही. दरम्यान, एका मुलाला शिक्षिका मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर खरा प्रकार उघड झाला.
आणखी वाचा
Comments are closed.