गुणरत्न सदावर्तेंची लिमोझिन गाडी दिसताच मराठा आंदोलक धावून गेले अन्… जालन्यात हायव्होल्टेज

गुणरात्ना सादावर्ते हल्ला: मराठा आरक्षणाला सातत्याने विरोध करणारे आणि मनोज जरांगे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेणारे अ‍ॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर जालन्यात मराठा आंदोलकांनी (Maratha Agitators) हल्ला केल्याचा प्रकार घडला. गुणरत्न सदावर्ते हे रविवारी जालना येथील धनगर उपोषण(Dhangar Agitation) आंदोलनाला भेट जाण्यासाठी जात होते. त्यांच्या गाड्यांचा ताफा रस्त्यावरुन जात असताना पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. यावेळी मराठा आंदोलक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते. याठिकाणी पोलीस बंदोबस्त होता. आंदोलकांना पाहून पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचले होते. यानंतर आंदोलक गाडीवर धावून जातील, असे पोलिसांना वाटले नव्हते. मात्र, एके ठिकाणी आंदोलकांनी पोलिसांना चुकवून गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांची गाडी गाठण्यात यश मिळवले. या आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर धावून जात काचेवर फटके मारले. हा प्रकार पोलिसांच्या लक्षात येतात त्यांनी मराठा आंदोलकांना तातडीने पकडले. मात्र, तोपर्यंत दोन-तीन मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या लिमोझिन गाडीच्या काचेवर फटके मारले होते. यानंतर पोलिसांनी सर्व मराठा आंदोलकांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये काही मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) समर्थक विश्वंभर तिरुखे यांचाही समावेश असल्याचेही समजते. त्यामुळे आता पोलीस या आंदोलकांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या हल्ल्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीचे किरकोळ नुकसान झाले आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी यापूर्वीच मराठा आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. अशात आता गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर धावून जाणाऱ्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करुन कारवाई केल्यास मनोज जरांगे पाटील आक्रमक होऊ शकतात. मराठा आरक्षण आंदोलन ऐन भरात असताना राज्यातील अनेक नेते मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध तोंडातून शब्द काढायची हिंमत करत नव्हते. त्यावेळी अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी अत्यंत आक्रमक भाषेत मनोज जरांगे पाटील यांचा समाचार घेतला होता. त्यांनी मुंबईतील मराठा आंदोलनालाही विरोध केला होता. मनोज जरांगे पाटील यांची मागणी संवैधानिक नसल्याचे सांगत गुणरत्न सदावर्ते यांनी सातत्याने मराठा आरक्षणाच्या मागणीला विरोध केला होता.

यापूर्वी मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीत उपोषणाला बसले असताना काही मराठा आंदोलकांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या मुंबईतील घराबाहेर असणाऱ्या गाडीच्या काचा फोडल्या होत्या. त्यानंतर मराठा आंदोलकांकडून गुणरत्न सदावर्ते यांना अनेकदा इशारेही देण्यात आले होते. मात्र, गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला विरोध करणे सुरुच ठेवले होते.

https://www.youtube.com/watch?v=mqp8qds4kds

आणखी वाचा

मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी गळ्यातील उपरणी काढून पाटलांना झाकलं, सहीसलामत बाहेर काढलं

अंतरवालीत लाठीचार्जचा आदेश कुणी दिला सगळ्यांनाच माहिती, त्याचं समर्थन करू नका; रोहित पवारांचे भुजबळांना उत्तर

आणखी वाचा

Comments are closed.